आमदार राजू कारेमोरेकडून शॉटशर्किटमुळे जळलेल्या दुकानदाराला तात्काळ आर्थिक मदत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्री संत जगनाडे चौक मोहाडी येथून ३ किमी अंतरावरील कुशारी येथे शॉटशर्किटमुळे जळलेल्या दुकानदार नितेश सीताराम गायधने यांना आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्याकडून रविवार दि. २३ एप्रिल २०२३ ला पाच हजार रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली. कुशारी येथील दुकानदार नितेश सिताराम गायधने यांच्या दुकानाला शुक्रवार दि.२१ एप्रिलला मध्यरात्री १२ वाजता शॉट शर्किटमुळे आग लागली आणि त्यांच्या दुकानात असलेले सामान पूर्ण जळून राख झाले.

या घटनेची माहिती सरपंच मुरलीधर गायधने यांनी आमदार राजू कारेमोरे यांना दिली. त्यांच्या नुकसान पाहनी करण्याकरीता आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे स्वत: मोहाडी येथील आमदार जनसंपर्क कार्यालयातील पक्षाचे निष्ठवान कार्यकर्त्ता सोबत घेऊन गेले. झालेल्या नुकसान दखल घेऊन आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्याकडून स्वत:च्या जवळील दुकानदार नितेश सीताराम गायधने यांना रोख ५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक, सरपंच मुरलीधर गायधने, अमोल गायधने, कोमल गायधने, सुभाष गायधने,पवन चव्हाण, हर्षल गायधने, सुभाष भाजीपाले, बादल गायधने, सुहास लांजेवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामवासी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *