लाखो रुपयांची दारू जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

इंडीगो एल एक्स चारचाकी वाहन व ह्युन्डाई कंपनीची आय२० चारचाकी वाहन हिरो कंपनीची स्प्लेन्डर दुचाकी वाहनासह ६ लाख ३९ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याविषयीची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. दिनांक २० जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार, एक टाटा कंपनीची पांढºया रंगाची इंडीगो एल एक्स चारचाकी वाहन क्रमांक एम.एच ३४ के ६३३४ या चारचाकी वाहनातून अवैधरीत्या दारुसाठा यवतमाळ जिल्हयातील कैलाशनगर येथून नकोडा घुग्घूस गावाच्या मागील रस्त्याच्या दिशेने येणार असे कळतात वाहनामधील मागच्या डीक्कीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मि.ली.च्या एकुण २ हजार ६०० बाटल्या वाहनासह किंमत २ लाख ६७ हजार ६०० जप्त केले.

दिनांक २१ जून रोजी ह्युन्डाई कंपनीची आय-२० चारचाकी वाहनामधील मागच्या डीक्कीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मि.ली.च्या एकुण १ हजार ५०० बाटल्या व हीरो कंपनीची स्प्लेंन्डर दुचाकी वाहनावर रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मि.ली.च्या एकुण १०० बाटल्या अशा दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये ६ लाख ३९ हजार २०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही कारवाईतील आरोपी फरार असून अज्ञात इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ), (ई) व ८३ अन्वये अज्ञात इसम फरार घोषित केले व गुन्हयाची नोंद घेण्यात आली. सदरील दोन्ही वेगवेगळी कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारोती पाटील व सहकारी सहा. दु. नि. अजय खताळ, जवान जगदीश कापटे,प्रविकांत निमगडे आदींनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *