मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करणाºया आॅटोचालकास अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एका ४७ वर्षीय मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करणाºया आरोपी नराधमास भंडारा पोलीसांनी अटक केली आहे. बसुराज पंढरी नंदेवर वय ५७ वर्षे रा. रमाबाई आंबेडकर वार्ड भंडारा असे आरापीचे नाव असुन तो एक आॅटोचालक आहे. पिडीत महिला ही मनोरूग्ण असुन ती २८ एप्रिल २०२३ पासुन बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा पोलीसात नोंदविण्यात आली होती. त्यानुसार भंडारा पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या महिलेचा शोध घेत होते.

दरम्यान ३० एप्रिल रोजी गणेशपुर श्मशानभूमी परिसरात एक महिला जख्मी व नग्न अवस्थेत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेत पिडीतेला उपचाराकरीता जिल्हा रुग्नालय भंडारा येथे भर्ती केले. रूग्णालयातील डॉक्टरांनी पिडीतेची वैद्यकीय तपासणी केली असता पिडीतेव लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पुढे आली.त्यानुसार भंडारा पोलीसांनी अप क्र. २३०/२०२३ कलम ३७६(२)( श्र),३७६(२) (प) ३५४ (ठ), २०१ भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पिडीताची स्थिती व पिडीताचे शरीरावरील जखमी पाहता प्रथमदर्शनी पिडीतावर बळजबरीने अतिप्रसंग झाला असल्याचे समजुन आले. त्यानुसार पोलीसांनी तपासाचे चक्रे फिरविली.

तपासा दरम्यान पोलीसांनी परिसरातील सिसिटीव्ही कॅमेºयाची तपासणी केली असता २८ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान गेला व रात्री १२.३० चया दरम्यान परत आल्याचे दिसुन आले. पोलीसांनी गोपनीय पध्दतीने सदर आॅटोचालकाची माहिती गोळा करण्यास सुरूवात करून संशईत आरोपी म्हणुन आॅटो रिक्षाचालक बसुराज पंढरी नंदेवर रा. रमाबाई आंबेडकर वार्ड भंडारा याला ताब्यात घेवुन घटनेसंदर्भात चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबुल केला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे , सहा.पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मीता राव यांचे मार्गदर्शनात भंडारा ठाणेदार पो. नि. सुभाष बारसे,पो. उपनि. कºहाडे, म. पो. उप. नि. उईके, पो. हवा इरशाद खान, पो. हवा. प्रशांत भोंगाडे, पो. हवा साजन वाघमारे, पो. हवा बालाराम वरखडे, पो. हवा. क्रिष्णा बोरकर, पो. ना. अजय कुकडे, पो. शि. नरेंन्द्र झलके, पो. शि. ओमप्रकाश सार्वे, पो. शि. संदीप नंदनवार, यांनी पार पाडली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.