अंगावर भिंत कोसळून ३ वर्षीय बालिका ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू असताना गावातीलच किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी जात असलेल्या एका ३ वर्षीय बालिकेवर वाºयामुळे भिंत कोसळल्याने बालिका ठार झाल्याची घटना घडली. ही घटना ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे घडली.देविका प्रकाश दिघोरे (३ वर्ष) रा सोनी असे अपघातातील मृत बालिकेचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास घटनेतील मृतक देविका गावातीलच एका किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. वादळी वारा सुरू असताना रस्त्यालगत असलेल्या शेषराव ऋषी मेघराज यांच्या घराची मातीची भिंत तिच्या अंगावर कोसळली. यात ती गंभीररीत्या जखमी झाली.

ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ विटा बाजूला सारत जखमी देविकाला उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्रउपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाºयांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांना होताच लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज उईके, पोलीस नायक सुभाष शहारे, पोलीस अंमलदार किशोर टेकाम यांनी घटनास्थळी पोहोचला घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात्सुरू आहे. तालुक्यातील सोनी परिसरात सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वादळ वारा सुरू होऊन गावातीलच किराणा दुकानात जात असलेल्या एका ३ वर्षीय बालिकेवर मातीच्या घराची भिंत कोसळून ठार झाल्याचे वृत्त माहीत होताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देत मृतक बालिकेच्या कुटुंबीयांची सांत्वना केली. शासनाकडून शक्य असलेली मदत करण्याचे देखील त्यांनी आश्वासित केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.