आज आढळले ११ नवे रूग्ण: क्रियाशील रुग्णांची संख्या आता २१

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. आज नवे तब्बल ११ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज आढळून आलेले ९ रुग्ण हे गोंदिया तालुका आणि २ रुग्ण हे सडक/अजुर्नी तालुक्यातील आहे. आज अकरा रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता १२२ वर पोहचली आहे. गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे १८४ अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत १०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता २१ क्रियाशील रुग्ण आहे आज आढळलेल्या रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील ९ रुग्ण व सडक/अजुर्नी तालुक्यातील २ रुग्ण यांचा समावेश आहे.गोंदिया तालुक्यात आज आढळून आलेले रुग्ण हे मुंडीपार औद्योगिक वसाहतीत एका कंपनीतील असून हे सर्व नागपूर येथे बाधित आढळून आलेल्या व नंतर मृत्यू पावलेल्या कंपनीच्या मॅनेजरच्या संपर्कात आलेले आहे.

हे रुग्ण २० ते ६० वर्ष वयोगटातील आहे.तर सडक/अजुर्नी तालुक्यात आढळून आलेले रुग्ण हे राका आणि सौंदड येथील आहेत.ते २० ते ४० वर्ष वयोगटातील आहे. गोंदियाच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयित २८१३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये १२२ रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.तर १८४ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये ३६२ आणि घरी १६४२ अशा एकूण २००४ व्यक्ती विलगीकरणात आहे. जिल्ह्यात आता क्रियाशील कंटेंनमेंट झोन दहा असून यामध्ये गोंदिया तालुका – मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव, पारडीबांध कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका – पाऊलदौना, बामणी व पाथरी आणि तिरोडा तालुका -तिरोडा (सुभाष वार्ड) आदी.दहा झोनचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *