पालकमंत्र्यांच्या हस्ते माविम मित्रमंडळ सदस्यांचा ‘सुधारक सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी महिलांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क व अधिकार यासाठी लढा दिला. महिलांना त्यांचे हक्क व शिक्षणाची संधी मिळवून देण्यास क्रांतीकारक काम केलेले आहे. या महापुरुषांच्या कार्याची प्रसिध्दी जगभर आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिल २०२३ रोजी १९६ वी जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२३ रोजी १३२ वी जयंती निमित्ताने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा Gender Sensitive Role Model म्हणून वामनराव बिसेन रिसामा (आमगाव), मोहन रहांगडाले डव्वा (गोंदिया), तेजेश्वर डोहळे मोहाडी (गोरेगाव), पुरणलाल मटाले चारभाटा (देवरी), विलास कटरे बकीटोला (सडक/अर्जुनी), युवराज बारेवार बिर्सी (तिरोडा), कैलास बोपचे खोलगड (सालेकसा) यांना ८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातीलजिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘सुधारक सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, खासदार सुनिल मेंढे, खासदार अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापूरे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर उपस्थित होते. नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्युट्रीशन या घटकाकरीता २०२२-२३ वर्षाच्या नियोजनाप्रमाणे ‘Gender Sensi- tive Role Model Award’ महिला सक्षमीकरणाकरीता संवेदनशील व गावपातळीवर महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा सत्कार करणे. या उपक्रमाचा मुळ हेतू म्हणजे गावस्तरावर ‘Men Gender Sensitive Role Model’
तयार होणे व महिला सक्षमीकरणाकरीता पुरक वातावरण तयार करणे हा आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, राम सोनवाने, तृप्ती चावरे, कुंजलता भुरकुडे यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.