छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर प्रदर्शनीचे आयोजन

भंडारा पत्रिका /प्रतिनिधी तुमसर : येथील राजाराम लॉन्स येथे तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्रांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांचे करिअर शिबिर (समुपदेशन मेळावा) व करिअर प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये साधारणत: १०वी,१२वी नंतर काय? भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्त्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी, इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रोजगार व स्वयंरोजगार, शैक्षणिक व इतर कर्ज उपलब्ध करून देणाºया बँक, वित्तीय संस्था इत्यादी बाबत प्रमुख तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

करियर शिबिराचे उद्घाटन सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी, नगरपरिषद तुमसर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत आवारे, प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, भंडारा हे होते. मार्गदर्शन सत्रामध्ये रवींद्र रहमतकर, इर्शाद अहमद अन्सारी, रविंद्र तुळशीराम वाघमारे, वि.के.खारमते, पांडुरंग बावनकर, आदित्य रवींद्र पंधरे, कमलेश बी.लांजेवार, प्रमोद पालटकर, के.के. पंचबुधे, देवेंद्र पिसे, यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन गुणवंतराव साळुंखे, शिल्प निदेशक, प्रास्ताविक एस.एस. पंचबुधे, गट निदेशक, आभार प्रदर्शन सौ.एन.डी. पीसे, प्राचार्य औ.प्र.संस्था, तुमसर व भाऊराव निंबार्ते, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी केले. करिअर शिबिरात शासकीय आयटीआय, तुमसर व मोहाडी येथील कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी, तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील सर्व खाजगी आयटीआयचे प्राचार्य, कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता औ. प्र.संस्था तुमसर येथील सर्व कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.