संस्कारमय विद्यार्थी घडविण्याकरिता सदैव प्रयत्न करणार

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : स्पर्धेच्या युगात वावरत असतांनी विद्यार्थी हे मोठ्या माणसांचा आदर सन्मान करायला विसरत आहेत. सततच्या मोबाईल वापरामुळे त्यांच्यात संस्काराचा अभाव पहावयास मिळत आहे. म्हणून विद्यार्थांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कार शिबिर आवश्यक आहे. संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य संस्काराचे धडे दिल्यास आजच्या पिढीला संस्कारमय करणे गरजेचे आहे त्याकरिता संस्कारमय विद्यार्थी घडविण्याकरिता सदैव प्रयत्न करणार असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांनी केले. ते सिल्ली येथील विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, ग्राम पंचायत सिल्ली, मुंबई सर्वोदय मंडळ मुंबई, रामपा बहु. सेवाभावी संस्था, व गांधी विचार मंच, समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्ली येथे आयोजित नि:शुल्क संस्कार शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते.

नाविण्यपूर्ण नि:शुल्क संस्कार शिबीराचे उदघाटन पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. भांडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिल्ली येथील उपसरपंच सामंत सुखदेवे, माजी संस्कार शिबिराच्या विद्यार्थीनी मनिषा कुकडे (क्षिरसागर), सामाजिक कार्यकर्ते तथा संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर, शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्कार शिबिराचे विद्यार्थ्यांना लहानलहान विविध उदाहरण देऊन बालवयापासूनच संस्काराचे बीजारोपण करावे असे मोलाचे मार्गदर्शन करून संस्काराचे महत्त्व विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. भांडारकर यांनी पटवून दिले. तर सिल्ली येथील उपसरपंच सामंत सुखदेवे यांनी संस्कार शिबिराला शुभेच्छा देत असे नेहमी व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले.

संस्कार शिबिराच्या माजी विद्यार्थीनी मनिषा कुकडे (क्षिरसागर) यांनी संस्कार शिबिराचे महत्त्व सांगून शिबिराला शुभेच्छा दिल्या आहेत. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण मार्गदर्शन केले. यादरम्यान संस्कार गीत, स्फुर्ती गीत, हसत खेळत विज्ञान, कथा कथन, स्मरण शक्ती खेळ, आपत्ती व्यवस्थापन, टाकाऊ तून टाकाऊ, अशा प्रकारे विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षक नितिश चांदेकर व प्रास्ताविक शिबीर सहप्रमुख यशवंत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शिक्षक लेखराज साखरवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोजकुमार खांडेकर, रत्नमाला बावनकुळे, राजश्री साखरवाडे, साक्षी पडोळे, अर्नव भदाडे, निश्चय कुकडे, उत्कर्ष चिमुरकर, रूचीता साखरवाडे, साची आकरे, माही मस्के, वैष्णवी बागडे, क्रिष्णा गिºहेपुंजे, तन्मय धुके, राज वंजारी, महेश धुके, प्रतिक साखरवाडे, इशान मस्के, शिवम चाचेरे, श्रावणी पडोळे, श्रेयश मस्के इत्यादी शिबीरातील विद्यार्थीविद्याथीर्नींनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.