कृषि विभागाद्वारे नाविण्यपूर्ण पध्दतीने भातलागवड

प्रतिनिधी गोंदिया : खरीप हंगाम २०२० मध्ये कृषि विभागाद्वारे शेतकºयांना धान लागवडीच्या विविध आधुनिक पध्दतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद देत आमगाव तालुक्यातील प्रयोगशील शेतकºयांनी पारंपारिक पध्दतीने शेती न करता आधुनिक पध्दतीने शेती करुन इतर शेतकºयांपुढे आदर्श निर्माण केला आहे. याचा भविष्यात फायदा होवून पारंपारिक पध्दतीत सुधारणा होवून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. भोसा गावामध्ये राधेश्याम मेंढे यांनी दोन एकर क्षेत्रात कृषि विभागाच्या सहकार्याने ड्रम सीडरने धान पेरणी केली असून या पध्दतीमध्ये पेरणीपूर्वी बियाणे २४ तास पाण्यात भिजवून अंकुरीत झाल्यावर पेरणी करतात. ड्रम सीडरने पेरणी केल्यास प्रती एकरी फक्त १० ते १२ किलो बियाणे लागतात.

दोन ओळीतील व रोपामधील अंतर नियंत्रित असल्यामुळे कीड व रोगाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होते. तसेच एका मजुराद्वारे दिवसाला तीन एकरापर्यंत लागवड करता येते. या पध्दतीमध्ये रोवणीसाठी खर्च न येता प्रती एकरी ५ हजार रुपयांची बचत होते. कुंभारटोली येथील संजय चौधरी व बोरकन्हार येथील अनिकेतसिंग कटरे यांनी मल्चिंगवर ठिबक सिंचनाद्वारे एक एकरमध्ये प्रथमच प्लास्टीक मल्चिंग व ठिबक सिंचनाद्वारे धान धेतीचा अनोखा प्रयोक करुन अतिप्रमाणात लागणारे बियाणे, पाणी, खते व लागणारी मजूरी यांची बचत केली आहे. आमगाव तालुक्यातील जवरी येथे सगुणा (रफळ) तंत्रज्ञान पध्दतीने संदिप ब्राम्हणकर यांनी लोखंडी साचा तयार करुन १ मीटर लांबीचे गादी वाफे तयार करुन २५-२५ से.मी. अंतरावर १ ते २ धानाचे दाने पेरुन लागवड केली आहें.

या पध्दतीने लागवड केल्यास खार टाकणे, चिखलणी, रोवणी इत्यादी कामे करावी लागत नाही. त्यामुळे मजुरीचा खर्च कमी करुन उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते. वरील प्रयोगशील शेतकºयांचा आदर्श घेवून कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली इतर शेतकºयांनीही पारंपारिक भात शेतीला बगल देत सगुणा पध्दत, प्लास्टीक मल्चिंगवर धान लागवड, ड्रम सीडरने धान पेरणी, श्री पध्दत, पट्टा पध्दत, चारसूत्री पध्दत, जपानी पध्दत इत्यादी नव्या तंत्राने धानशेती करायला हवी तरच भातशेतीमधून भरघोस तथा व्यवसायिक उत्पादन घेता येतो असा विश्वास देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *