गोसीखुर्द बाधितांचे खासदार श्रीकांत शिंदे यांना साकडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पूर्व विदर्भला हरितक्रांती चे दिवास्वप्न दाखवत ३५ वर्षांचा महाकालावधी आणि २० हजार कोटी रूपयांचा महानिधा जिरला तरी गोसीखुर्द धरण पुन्हा कालावधी आणि महानिधीच्या घोर प्रतीक्षेत अडकुन आहे. परिणामी बाधित कमालीच्या आर्थिक आणि मानसिक विवंचनेत जीवन जगत आहे. आपले घर, शेती आणि कायम रोजगार या प्रकल्पाला अर्पण करुन आपला व आपल्या अपत्यांचा उज्वल भविष्य अनेक नेत्यांना भेटून सावरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करित आहेत. मरता,क्या नही करता! याचे स्मरण करत, शेवटचा धक्का समजून खासदार श्रीकांत शिंदे यांना बाधितांचा शिष्टमंडल ९ मे २०२३ ला त्यांच्या पवनी दौºयादरम्यान वाही विश्राम गृहावर भेटले.

ग्रामपंचायत अंतर्गत नोंदलेले २१५६६ वाढीव कुटुंब ला २.९० लक्ष रुपए देनेसाठी ६१४.३४ कोटी रूपयांच्या शासनास सादर प्रस्तावाला मंजूर करणे आणि रोजगार निर्मितिसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करणेसाठी राज्य सरकार कडून ‘इंटरेस्ट सबवेंशन’ चे विशेष आदेश मंजूर करणे, या दोन अतिआवश्यक मुद्यासाठी लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात सभा घेवून निर्णय घेण्याचे पक्के आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले. यावेळी प्रकल्पग्रस्त यशवंत टिचकुले, मंगेश वंजारी, सरपंचा सौ. ज्योत्सना बोरकर, उपसरपंच जितेंद गजभिये, चंद्रशेखर कोठारे, जगदीश बोंदरे, संदीप गजभिये, अजय सेलोकर, भाऊ कातोरे, अजय इलूरकर आणि एजाजअली सय्यद उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.