सिहोरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत आमदार कारेमोरे यांचे हस्ते भूमिपूजन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जल जीवन मिशन अंतर्गत सिहोरा गावासाठी नव्याने मंजूर झालेल्या १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या नळ योजनेचे भूमिपूजन तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे हस्ते काल २० मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर तालुका अध्यक्ष धनेंद्र तुरकर यांचे अध्यक्षते खाली व ग्रामपंचायत सिहोराचे सरपंच रंजुताई तुरकर यांचे प्रमुख उपस्थितीत पिपरी चुंनी नदी काठावर पार पडले.

या भूमिपूजन सोहळ्याला सभापती रितेश वासनिक, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुषमा पारधी, पंचायत समिती सदस्य दीपमालाभवसागर, पिपरीचे सरपंच विजु पटले, रूपेराचे सरपंच राहुल दादा भवसागर, ग्रामपंचायत सदस्य कादर अन्सारी, श्रीराम ठाकरे, वाहनीचे माजी सरपंच गळीराम बांडेबुचे, बोरगावचे माजी सरपंच माणिक ठाकरे, उपसरपंच विनोद पटले, पिपरीचे पोलीस पाटील पटले, दिनेशतुरकर, तेजराम ठाकरे, चंदू बनसोड, बंसू तुरकर सिहोरा व पिपरीचे ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सिहोरा अंतर्गत सुरू असलेली नळ योजना ही दिवसें दिवस निकामी होत चालली होती. ग्रामवासियांना गढूळ पाणी मिळत होते. या गावाला नव्याने नळ योजनेची गरज होती.

नळ योजना नव्याने मंजूर व्हावी यासाठी ग्रामपंचायत सिहोराचे माजी सरपंच मधु अळमाचे, सदस्य कादर अन्सारी व काही सदस्यांनी सतत पाठपुरावा केला. तर आमदार राजू कारेमोरे व धनेंद्र तुरकर माजी सभापती यांनी अथक परिश्रम घेतले व नव्या नळ योजनेचा भूमिपूजन सोहळा संपन्न केला, हे यात उल्लेखनीय आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.