शेती स्मार्ट करण्यासाठी करावा यांत्रिकीकरणाचा वापर – गांधी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र साकोली व जे फार्म सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यट्रॅक्टर धारकांसाठी एकदिवसीय समूह चर्चा सत्राचेह्ण आयोजन कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे करण्यात आले होते. दिवसेंदिवस जिल्हयातील होत असलेला हवामान बदल त्याचा कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकºयांना संवेदनक्षम हवामान बदलासह समरस करून धान शेतीतील उत्पादकता वाढविण्याच्या व उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने भात लागवड पध्दतीमधे बदल करणे व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे तेवढेच गरजेचे आहे.

धान शेतीमध्ये उत्पादन वाढीकरीता यांत्रीकीकरणाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. उषा रा. डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र साकोली, प्रमुख पाहुणे दिलराज सिंग गांधीजे फार्म सर्विसेस प्रमुख, डॉ. शाकीर अली वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्रजिल्ह्यातील शेतीच्या यांत्रिकीकरणाची सविस्तर माहिती देऊन, यांत्रिकीकरणाची गरज याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वात शेवटी कार्यक्रमाप्रमुख दिलराज सिंग गांधी जे फार्म सर्विसेसचे कार्य व व्याप्ती सांगितली. उपस्थित शेतकºयांना भेट वस्तु देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत उंबरकर व आभार प्रदर्शन श्री. योगेश महल्ले यांनी केले. या कार्यक्रमाला एकूण ५५ शेतकरी, १० अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे फार्म सर्विसेस येथील श्री. शिवम ठाकूर, अनंता तितिरमारे, रुपेश कुशवाह व कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

गोंदिया, संजय अहिरवार जे फार्म सर्विसेस महाराष्ट्र राज्य प्रमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. संजय अहिरवार यांनी केली. यामध्ये त्यांनी जे फार्म सर्विसेस विषयी जिल्ह्यात सुरु असलेल कार्य या संदर्भात माहिती दिली. डॉ. शाकीर अली यांनी शेतकरी उद्योजक कसे होतील यावर मार्दर्शन केले. डॉ. उषा रा. डोंगरवार यांनी भंडारा जिल्ह्यातील शेतीच्या यांत्रिकीकरणाची सविस्तर माहिती देऊन, यांत्रिकीकरणाची गरज याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वात शेवटी कार्यक्रमाप्रमुख दिलराज सिंग गांधी जे फार्म सर्विसेसचे कार्य व व्याप्ती सांगितली. उपस्थित शेतकºयांना भेट वस्तु देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत उंबरकर व आभार प्रदर्शन श्री. योगेश महल्ले यांनी केले. या कार्यक्रमाला एकूण ५५ शेतकरी, १० अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे फार्म सर्विसेस येथील श्री. शिवम ठाकूर, अनंता तितिरमारे, रुपेश कुशवाह व कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.