वनहक्कधारकांच्या हक्कांसाठी आमदार उपोषणावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जंगलावर उपजिविका असणाºया आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी यांना सामूहीक वनहक्क व वनातील गौणउपजावर स्वामीत्त्व हक्क असतानाही गोंदिया वनखात्यातील अधिकाºयाांनी त्यांच्या हक्कावर गदा आणली.याविरोधात गेल्या सहा दिवसांपासून वनहक्कधारक आमरण उपोषणाला बसले. मात्र, वनखात्याला जाग आली नाही आणि अखेर आता आमदार सहसराम कोरोटे यांनी आजपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.जंगलालगतच्या गावकºयाांवर झालेले अन्याय कबुल करत शासनाने वनहक्क कायद्यानुसार त्यांना त्यांचे अधिकार दिले.

मात्र, वनखाते आणि खात्यातील अधिकारी अजूनही त्याच इंग्रजाळलेल्या मानसिकतेत वावरतआहेत. म्हैसुली ग्रामसभेस सामुहिक वन हक्क प्राप्त असताना सुद्धा वनविभागाच्या अधिकाºयाांनी ग्रामसभेने जमा केलेली तेंदूपाने जप्त केली. अवैधरीत्या जप्त केलेली तेंदुपाने त्वरीत नुकसान भरपाईसह ग्रामसभेच्या स्वाधिन करावे. तसेच पोलीस तक्रार अजार्नुसार संबंधित वनखात्याच्या अधिकाºयांवर त्वरीत अनुसुचित जाती जमाती प्रतीबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करुन आम्हा वनहक्कधारकांना न्याय द्यावा या मागणीसाठी वनहक्कधारकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.