तुमसर नगरपालिकेने चालविला अतिक्रमणांवर बुलडोझर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर शहरातील अतिक्रमणा चा विषय नवीन नसून नगरपालिकेने मुख्य बाजार पेठेतील तसेच बावनकर चौक पासून पुराना बस स्टॉप,नवीन बस स्टॉप परिसरातील अतिक्रमणावर तुमसर नगरपालिकेने बुलडोझर चालवायला सोमवार पासून सुरूवात केली आहे. व्यापाºयांनी रस्त्यावर व मुख्य नाल्यावर दुकानें थाटली त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नाल्याची साफसफाई जोमात सुरु असून नाल्यावर दुकाने असल्याने नाले सफाई करण्यास सुद्धा पालिकेला त्रास होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली.

शहरातील फुटपाथवर हातगाडीवाल्याणी दुकानें थाटली आहेत त्यातच मोठया दुकानदारांनी देखील रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ते गिळकृत करत साहित्य रस्त्यावर लावले. परिणामी रस्ते अरुंद झाले असून रहादारिला अडथळा निर्माण झाला होता. बेकायदेशीर अतिक्रमण जेसीबीच्या सहायाने जमीनदोस्त करण्यात येत असल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम व अतिक्रमण पथकासह यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अमर धंदर, पोलीस ठाण्याचे कर्मचारी सह चोख बंदोबस्त ठेवला होता.

सराफा ओळीतील सुद्धा अतिक्रमण काढा

शहरातील विविध ठिकाणी नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची सुरुवात केली असल्याने सराफा लाईन मध्ये सुद्धा मोठया प्रमाणात व्यापाºयांनी अतिक्रमण केले आहे.त्यामुळे येथील सुद्धा बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.