तीन राज्यातील सराईत गुन्हेगारांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाने तीन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातुन नगदी व सोने-चांदीचे दागीने असा एकुण ४ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस तपासात आरोपींनी महाराष्ट्रासह छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यातसुध्दा चोरी-घरफोडी केल्याचे उघडकीस आले. अनिल चुन्नीलाल बोरकर, वय ३७ वर्ष, रा. शिवाजी वार्ड, साकोली, अक्षय दिनेश गुप्ता, वय २४ वर्ष, रा. २१५१/ शादीपुर डेपो, बेस्ट पटेल नगर, नवी दिल्ली, ह. मु. शिवाजी वार्ड, साकोली व रवी रमेश माचेवार, वय ३७ वर्ष, रा. नंदनवन नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. भंडारा शहरातील स्नेह नगर येथीलआनंद मोहतुरे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता घरी कुणीही नसल्याने सुना मोका पाहुण अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन, अज्ञात आरोपीने सुनामौका पाहुन त्यांच्या घराचा मागील दरवाज्यातुन प्रवेश करुन आलमारीतील रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन भंडा-रा येथे दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी नोंदविण्यात आली होती.

त्या आधारे भंडारा स्थागुशा च्या अधिकाºयांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. दरम्यान स्थागुशा चे शैलेश बेदुरकर यांना गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन घरफोडी करणारा साकोली येथील सराईत गुन्हेगार अनिल चुन्नीलाल बोरकर, वय ३७ वर्ष, रा. शिवाजी वार्ड, साकोली व अक्षय दिनेश गुप्ता, वय २४ वर्ष, रा. शादीपुर डेपो, बेस्ट पटेल नगर, नवी दिल्ली, ह. मु. शिवाजी वार्ड, साकोली. यांनी दोघांनी मिळुन आनंद मोहतुरे यांच्या घरी घरफोडी केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. परंतु अनिल बोरकर व अक्षय गुप्ता हे दोघेही चाणाक्ष असल्याने त्यांना अटक करण्याचे मोठे आवाहन स्थागुशा पुढे होते . दरम्यान स्थागुशा ला भंडारा येथील जिल्हा परीषद चौकात अनिल बोरकर सारखा दिसणारा व्यक्ती असल्याची खबर शैलेश बेदुरकर यांना मिळाल्यानेत्याच क्षणी अनिल बोरकर व अक्षय गुप्ता यांना ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींना स्थानिक गन्हे शाखा भंडारा येथे आणुन विचारपुस केली तेव्हा त्यांनी भंडारा येथील घरफोडी केल्याचे कबुल केले. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने भंडारा जिल्ह्यातील भंडारा पोलीस स्टेशन तसेच वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील तिसरा साथीदार रवी रमेश माचेवार, वय ३७ वर्ष, रा. नंदनवन नागपूर याच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपींच्या आरोपीतांच्या ताब्यातुन ३ लाख २५ हजार रुपए किंमतीचा एक सोन्याचा शिक्का , १ लाख ६० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकुण ४ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला . अधिक तपासाकरीतातिन्ही आरोपीतांना पोलीस स्टेशन भंडारा च्या ताब्यात देण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.