खोटया कागदपत्राने श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न

तालुका प्रतिनिधी मोहाडी : शासनाच्या श्रावणबाळ निवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजना सारख्या योजनेचा लाभ मिळवून देणारी टोळी तालुक्यात कार्यरत असून असे हजारो बोगस प्रकरणे खोटे दस्तऐवज तयार करून दाखल करण्यात आल्याची दाट शक्यता आहे. या प्रकारचे ३५ प्रकरणे उजेडात आले असून, यातील दोन-चार व्यक्ती वगळता इतर सर्व ३५ ते ५० वर्षाच्या आतील आहेत, तसेच या सर्व प्रकरणात तलाठ्यांची स्वाक्षरी कॉपी-पेस्ट करून वापरण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकारच्या सर्व प्रकरणांची चौकशी केल्यास मोठे घबाड उजेडात येण्याची शक्यता आहे. श्रावण बाळ निवृत्ती योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत ६५ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना शासनाकडून दर महिन्याला एक हजार रुपये अनुदान प्राप्त होतो. ही योजना निराधार असलेल्या वृद्धांसाठी आहे. परंतु ज्यांचे मुले शासकी य नोकरीवर आहेत, किंवा ज्यांची मुले चांगले व्यवसाय करीत आहेत, किंवा जे व्यक्ती सघन आहेत असे अनेक व्यक्ती आज या योजनेचा लाभ घेत आहेत.

राजकीय लाभासाठी ग्रामीण भागातील अनेक तथाकथित नेते भोळ्याभाबड्या जनतेला भूल देऊन ज्यांचे वय ६५ वर्षापेक्षा कितीतरी कमी आहे अश्या व्यक्तीच्या आधार काडार्तील जन्म तारखेत कंप्यूटरद्वारे खोडखाड करून तसेच खोटे वैद्यकीय प्रमाण पत्र तयार करून ४० वर्षाच्या व्यक्तीला ६५ वर्षाचे दर्शवून या प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देतात. या साठी त्यांच्याकडू न पैसेही उकळतात आणि निवडणुकीत त्याचा फायदाही उचलतात. किंवा वैद्यकीय अधिकाºयाला मॅनेज करून ६५ वर्षाचा दाखला सुद्धा प्राप्त करून घेतात. तर पैसे कमविण्यासाठी काही टोळ्यासुद्धा या कामासाठी कार्यरत आहेत. मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथील ३५ व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. परंतु या योजनेसाठी लागणाºया तलाठी अहवालासाठी या सर्व अर्जदा- रांनी तेथील तलाठ्यांकडे न जाता त्यांची स्वाक्षरीची नक्कल करून कॉम्प्युटरद्वारे कॉपी-पेस्ट करून बोगस तलाठी अहवाल तयार केला व या प्रकरणा सोबत जोडला. मात्र हे तेथील तलाठी अंकुश धांडे यांच्या लक्षात आल्याने बिंग फुटले. त्यामुळे तलाठ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याची तक्रार तहसीलदार मोहाडी यांच्याकडे केली असून तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे, चौकशी अंती संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या सर्व ३५ प्रकरणावर साक्षीदार म्हणून तेथील एकाच व्यक्तीने स्वाक्षरी केलेली आहे. या प्रकरणात जोडलेले जांब येथील डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट आहे की काय हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. या सर्व घडामोडी वरून असे लक्षात येते की ग्रामीण जनतेकडून पैसे लुबाडून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणारी टोळी सक्रिय असल्याची दाट शक्यता असून खºया लाभार्थींना वगळून बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणाºया अशा प्रवृत्ती विरुद्ध कारवाई होणे गरजेचे झाले आहे. आजही अनेक खरे लाभार्थी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत मात्र त्यांना लाभ मिळालेला नाही.

‘‘प्रथम दर्शनी प्रकरण गंभीर असल्याचे वाटते, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नायब तहसीलदार श्री हुकरे यांना दिलेले आहेत.’’

देवदास बोंबुर्डे तहसीलदार मोहाडी

‘‘हि ३५ प्रकरणे माज्याकडे आलीच नाही. आणि मी तलाठी अहवाल भरून दिलेला नाही. तसेच स्वाक्षरी सुद्धा मी केलेली नाही. माझी स्वाक्षरी एखाद्या प्रमाणपत्रावरून उचलून कॉपी पेस्ट करून खोटा अहवाल तयार करण्यात आला आहे, याची तक्रार तहसीलदार मोहाडी यांच्याकडे केली आहे.’’

अंकुश धांडे, तलाठी, धोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *