सरपंच-सचिवांनी केली ग्रा.पं.च्या पैशाची अफरातफर

 

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील परसोडी ग्राम पंचायतीच्या महिला सरपंच व सचिवांनी संगनमत करून ग्राम पंचायतीच्या सामान्य फंडातील अंदाजे दोन लक्ष रूपयाची अफरा-तफर केल्याचा आरोप ग्राम पंचायत उपसरपंच व इतर सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना लेखी तक्रार देत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मौजा परसोडी येथील सरपंच नंदा प्रभाकर वंजारी व ग्रामविकास अधिकारी एन एम रंगारी यांच्या उपस्थितीत दिनांक २८ मार्च २०२३ला मासिक सभा घेण्यात आली . मासिक सभा इतिवृत्त नोंदवही (प्रोसिडिंग बुक) मध्ये उपस्थित सदस्य ांच्या सह्या घेऊन सभा सुरू करण्यात आली. सभेचे अध्यक्ष सरपंचा नंदा वंजारी यांना उपस्थित सदस्यांनी प्रोसेटिंग बुक वर मासिक सभेचे इतिवृत्ताची विषयानुसार नोंद घेण्यात यावी अशी मागणी केली परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी आम्ही नोंद लिहीत नाही नंतर आपल्या मजीर्ने लिहू असे उत्तर दिले.

पुढील महिन्यात २६ एप्रिल २०२३रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेमध्ये उपस्थित सदस्य यांच्या स्वाक्षरी घेऊन सभा सुरू करण्यात आली.यावेळी मागील सभेचे कार्यवृत्तांत वाचन करण्यात आले त्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगच्या साहित्य व इतर सामान खरेदी बाबतचा उल्लेख करण्यात आला परंतु दिनांक २८ मार्च २०२३ च्या सभेमध्ये इलेक्ट्रिक फिटिंगच्या साहित्य व इतर सामान खरेदी बाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती व त्याबाबत कोटेशनसुध्दा बोलविण्यात आले नव्हते असे असतांना हा विषयआलाच कसा असा प्रश्न उपस्थित सदस्यांनी मांडला.दिनांक २८ मार्च २०२३ च्या मासिक सभेमध्ये ग्रामविकास अधिकारी यांनी मागील सभेच्या कार्यवृत्तांत वाचन करतांनी त्यावर उपस्थित उपसरपंच व सदस्य यांनी आक्षेप घेतला, परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी इलेक्ट्रिक साहित्य व इतर सामान स्वत: खरेदी केल्याचे सांगत नंतर सभा सुरू असताना जमा खर्च वाचन करताना सदर इलेक्ट्रिक साहित्य व इतर साहित्याचे सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी त्याच महिन्यामध्ये स्वमजीर्नेठराव लिहिला व त्याच महिन्यांमध्ये चेक (धनादेश) सुध्दा देण्यात आले.

यामधुन मासिक सभेमध्ये सदर साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे . करिता सदर प्रकरणाची ग्राम पंचायतीचे उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य यांच्या समक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत चौकशी करून सरपंच नंदा वंजारी व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदनावर ग्राम पंचायत उपसरपंच पंकज सुखदेवे,ग्राम पंचायत सदस्य सर्वश्री मच्छिंद्र फंदे,प्रशांत मेश्राम, विजय दादुरवाडे,मनीषा वंजारी,अर्चना डोरले,उषा आकरे,संगीता गजभिये यांच्या स्वाक्षºया आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.