राष्ट्रवादीने पाळला खोकेविरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात वर्षभरापूर्वी धनशक्तीच्या भरवशावर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. पैशाचा भरवशावर लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. या निषेध म्हणून मंगळवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राकॉं जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, अ‍ॅड.जयंत वैरागडे यांच्या नेतृत्वात ‘गद्दार निषेध दिवस’ पाळत भंडारा जिल्हा राष्टÑवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात आले. शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला २० जून रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. खोकेवीरांच्या वर्षपुर्तीनिमित्त गद्दार दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षीमहाराष्ट्राशी गद्दारी करुन गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात वर्षपुर्ती झाल्यानंतर ही सरकार युवकांना रोजगार, महागाई, शेतकरी, शेतमजूर या सारख्या सर्वच मुद्यावर अपयशी ठरलेल्या या खोके सरकार शिंदे गटाविरोधात सत्तांतराचा निषेध म्हणून प्रतिकात्मक घोषणा करुन गद्दार दिवस म्हणून निषेध करण्यात आला. खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. कट करून फोडा-फोडीचे राजकारण करुन शिंदे – भाजप सरकार सत्तेत आले. करीता भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे हा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे भाजप गट सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली तसेच गद्दार हटाव महाराष्ट्र बचाव, महाराष्ट्रातून गद्दार होणार हद्दपार अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, बाबु बागडे, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, पं.स. सभापती रत्नमाला चेटूले, व मोठया संख्येने शहरी, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.