साकोलीत गोंदिया-नागपूर बसला पहाटे अपघात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोंदिया – नागपूर जाणारी बससमोर न.प. चौकात अचानक दूचाकीवर तीनसीट विद्यार्थ्यांनी वळण घेतल्याने बसचालकानी त्यांना वाचविण्यासाठी चालकाने आपले प्राण धोक्यात टाकून बस डिव्हॉयडरवर नेऊन चढविली आणि तीन विद्यार्थ्यांसह आतील बसलेल्या प्रवाशांना सूरक्षीत वाचविले. पण चालकाच्या पायाला गंभीर स्वरूपाची इजा झाली असून चालकाला साकोली आगार व्यवस्थापन कर्मचा-यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काल शुक्रवार २३ जून पहाटे ५:४५ ला साकोली बसस्थानकावरून गोंदिया – नागपूर बस क्र. एम एच ४० एक्यू ६०८० ही शहरातील नगरपरिषद चौकात आली असता पश्चिम दिशेने अचानक दूर्गा मंदिर रोडाने शिकवणी वगार्ला जाणा-या दूचाकीवर तीन सीट विद्यार्थ्यांनी वळण घेतले, समोर अचानक बस पाहून विद्याथ्यार्चा गोंधळ उडाला.

इकडे तिकडे वळण घेतले त्यातच सावध बसचालकानी त्यांना वाचविण्यासाठी एसटीचे ब्रेक जोरात लावले. बसचे संतूलन ताब्यात ठेवून चालकाच्या प्रसंगावधानाने बस डिव्हायडरवर चढविली. यात डिव्हायडर वरील लोखंडी ग्रील मूळे बस चालकाच्या पायाला गंभीर जखमी झाली. यावेळी बसमध्ये ७ ते ८ प्रवासी भंडारा नागपूर प्रवास करीत होते. आणि ते तीनसीट अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गाडी वळवून तिथून पोबारा केला. असे प्रत्यक्षदर्शी पहाटेच्या पावली फिरणा-यांनी सांगितले. तातडीने विलास मासुरकर यांनी बस वाहकाच्या मदतीने साकोली बसस्थानक येथे फोन करून जखमी चालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. बसमधील प्रवाशांसाठी साकोली आगाराची दूसरी बसची व्यवस्था केली गेली.

अश्या घटनेत पालकांची एक घोडचूक समोर आली आहे की अल्पवयीन आणि विना परवाना विद्यार्थ्यांना दूचाकी देणे हे वाहतूक नियमाने गंभीर स्वरूपाचा गुन्हाच असून याप्रकारे आपल्या मुलांसह इतरांच्या जीवाशी खेळणा-या अश्या बेजबाबदार पालकांवरच साकोली वाहतूक पोलीसांनी तात्काळ कारवाई करण्याची नितांत गरज असल्याचे यावेळी नागरीकांनी सांगितले आहे. कारण सदर घटनेत आज मोठा जिवीतहानीचा धोका एका सावध बस चालकाच्या समयसूचकतेने टळला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.