दिशा संस्थेने आरोग्य व सामाजिक क्षेत्रात प्रगती करावी – राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आज दिनांक ९ जुलै रोजी दरेकसा आदिवासी भागात कार्यरत असलेल्या दिशा आरोग्य संस्थेचे २४ वे वर्ष निमित्त डॉ.देवाशीष चटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिशा संस्थेच्या माध्यमातून दरेकसा आदिवासी भागात अनेक सामाजिक व आरोग्यविषयक कामे पूर्ण करण्यात आली. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिशा संस्थेला आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अधिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. दिशा आरोग्य कुटीरच्या प्रांगणात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक खासदार निधीतून (रु. १५ लाख) नव्याने बांधलेल्या गट्टूचे उद्घाटन संपन्न झाले. दिशा आरोग्य संस्थेने प्रफुल्ल पटेल , माजी आमदार राजेंद्र जैंन यांचे आभार मानले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, डॉ. देवाशिष चॅटर्जी, डॉ. कुड्डे, डॉ. प्रमोद मुंदडा, डॉ. दीपक बहेकर, श्री. जुगलकिशोर अग्रवाल, डॉ. विकास जैन, डॉ. बजाज, डॉ. दर्पण चौधरी, राजेंद्र पटेल, डॉ. अनुराग बहेकर, दिनेश पटेल, विजय शिवणकर, रमेश भैय्या, डॉ. साजिद, डॉ. अभिजित शेंडे, वानखेडे गुरुजी, विनय अग्रवाल, हरगोविंद चौरसिया, रौनक ठाकूर. संस्थेच्या पदाधिकाºयांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.