विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद देऊन जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करून विविध आपत्तीपासून स्वत:चे व इतरांचे संरक्षण कसे करावे व या दरम्यान कोणत्या कृती करावी? याबाबतची माहिती व प्रात्यक्षिक प्रशिक्षण मक्काटोली येथील पंचशील महाविद्यालय मक्काटोला येथील विद्यार्थ्यांना रंगीत तालीमेद्वारे देण्यात आली. यावेळी सालेकसाचे तहसीलदार नर्सया कोंडागुर्ले, आमगावचे तहसीलदार रमेश कुंभरे, देवरीचे नायब तहसीलदार अनिल पवार, प्राचार्य एस पी नंदेश्वर, जिल्हा शोध व बचाव पथकाचे प्रमुख नरेश उईके, संरक्षण दलाचे मास्टर ट्रेनर इंद्रकुमार बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांना विज व भूकंपाबाबत माहिती व या दरम्यान करावयाच्या कृतीबाबत माहिती देवून मॉकड्रिलच्या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमध्ये तसेच पूर परिस्थिती दरम्यान स्वत:चे व इतरांचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण पुजारीटोला जलाशयात प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पूर परिस्थितीच्या वेळी शोध व बचाव कामात उपयोगी रबर व फायबर बोटी, लाइफ जॉकेट, लाइफ बॉय, इमरजेंसी लाईट, मशीन, सर्चलाईट, सेटेलाईट फोन, मेगाफोन तसेच घरघूती टाकाऊ वस्तूंपासून तयारकरण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस इत्यादी सर्व साहित्यांचा वापर कसा करावा, याबाबतची माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हा शोध बचाव पथकाचे सदस्य दुर्गा प्रसाद गंगापारी, जसवंत रहांगडाले, राजाराम गायकवाड, दिनू दिप, रविंद्र भांडारकर, संदीप कराडे, सुरेश पटले, मुकेश अटरे, गृहरक्षक चुन्नीलाल मुटकुरे, चिंतामण गिºहेपुंजे, गिरधारी पतैह तसेच महसूल उपविभाग देवरी येथील अधिकारी व कर्मचारी, पोलिस विभागातील पोलिस कर्मचारी, आमगाव व सालेकसा नप येथील कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.