सोनी येथे विद्यार्थ्यांचा रास्तारोको आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नियमित वेळेवर बस उपलब्ध नसल्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून आज सोमवार ला सकाळी १० वाजताच्या सुमारास शेकडो विद्यार्थ्यांनी सोनी येथील लाखांदूर वडसा हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणे आंदोलन केले. तब्ब्ल दोन तास विद्यार्थ्यांनी हा मार्ग रोखुन धरल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.अखेर आंदोलन स्थळी लाखांदूर पोलिसांनी भेट देत विद्यार्थ्यांची समजूत काढल्यानतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले .

सोनी येथील विद्यार्थ्यांना लाखांदूर तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे शिक्षणासाठी दररोज जावे लागते. मात्र, शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी बसेस उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले त्यामुळे रास्ता रोकोचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. त्यास सोनी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पाठींबा देत आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान लाखांदूर पोलिसांनी सर्वांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.