पूनर्वसित गावातील समस्यांचे तात्काळ निराकरण करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील गोसे प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन केलेल्या गावात व्याप्त समस्यांचे सर्वे करून त्या लवकरात लवकर सोडविण्याचे प्रयत्न करा. सोबतच ज्या बंधितांना भू संपादन झाल्यावर ही मोबदला मिळाला नाही अशा परिवारांना तत्काळ मोबदला देण्यात यावा आणि ज्या गावांचे पुनर्वसन रखडले आहेत त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची सूचना आ. नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिली. गेल्या आठवड्यात सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचा आढावा सुद्धा या वेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी नेरला, खापरी(रहपाडे) व पिंडकेपार (टोली) या पूर्णत: बाधित गावांच्या पुनर्वसनची स्थिति जाणून घेतली. इतकेच नाही तर या क्षेत्रातून आलेल्या बंधितांच्या समस्या जाणून घेतल्या आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढून पुनर्वसन करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. सोबतच या क्षेत्राचे ताबडतोब सर्वेकरून पडित आणि जीर्ण झालेल्या घरांची नोंद करून घेण्याची सूचना केली. जेणेकरून पुनर्वसन च्या वेळी घरांचा मोबदला देण्यात अडचणी निर्माण होणार नाही.

या व्यतिरिक्त गोसे प्रकल्प अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ३२ गावांच्या झालेल्या पुनर्वसन आणि त्यांच्या क्षेत्रात व्याप्त समस्या संदर्भात ही सविस्तर चर्चा या वेळी करण्यात आली. यात उर्वरित वाढीव कुटुंबांना २.९० लक्ष रुपयाचा अनुदान देण्या संदर्भात माहिती हेनयात आली. जलाशयाचा २४५.५०० मीटर चा जालसाठा झाल्या नंतर जे गाव बाधित झाले त्यांचा सर्वे होऊन सुद्धा आज पर्यंत त्यांना मोबदला मिळाला नाही. अशा कुटुंबियांची शेतजमीन संपादित करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी असे निर्देश आ. भोंडेकर यांनी या वेळी दिले. सोबतच प्रकल्पग्रस्तांना प्लॉट वाटप करतांना येणाºया अडचणी दूर करून ज्या शेतकºयांना छोटे प्लॉट देण्यात आले आहे त्यांना बदलून देणे आणि मूळ प्रकल्पग्रस्त असतांना ज्यांना प्लॉट देण्यात आले नाही अशा लोकांना तत्काल प्लॉट वाटप करण्यात यावे. प्रकल्प बाधित ग्राम बेरोडी येथे ले आउट चे केरी पूर्ण करून तत्काल प्लॉट वाटप करण्याचे निर्देश सुद्धा आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. तसेच प्रकल्पग्रसतांसाठी कायम रोजगार निर्मिती करीत बिन व्याजी कर्ज व प्रशिक्षण देण्यात यावे ज्या करीत पुढील बैठकीत बँक अधिकाºयांना सुद्धा उपस्थित पाहण्याची सूचना आ. नरेंद्र भोंडेकर यांनी दिली. आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर सह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.