जागतिक किर्तीच्या फोटोचा मान मिळू शकतो!

आ जपासून १८४ वर्षाआधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ आॅगस्टला जागतिक छायाचित्रण दिनाच्या रुपात साजरा करतात. काही वर्षांपूर्वी कॅमेºयातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट तशीच आहे. गणेशोत्सवजवळ आला आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात.

हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले. प्रकृतीने प्रत्येक प्राणीला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे,ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छवीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे.तस पाहिले तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केलीआणि अनेक आविष्कारा सोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळेसोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण फोटोग्राफी डे च्या रुपात साजरा करतो. फोटोग्राफरना कॅमेरा घेताना फार दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण कोणत्या प्रकारचे काम करतो, आपल्याला फोटो सर्वात मोठा किती साईजमध्ये करावयाला लागतो,आपण कोणत्या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर आपल्याला अंदाजे झूम किंवा वाईड लेन्सची गरज किती आहे,हे पाहणे गरजेचे आहे.

शिवाय कॅमेरामध्ये आॅडीओ,व्हिडीओची सोय आहे काय,फोकसिंग पॉईंट किती आहे व त्यामध्येकशा स्वरुपात आपण बदल करू शकतो, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.कॅमेरा घेतल्यानंतर त्या कॅमेºयाबरोबर आलेले कॅटलॉग महत्त्वपूर्ण ठरतात. फोटोग्राफीची भाषा.उदा. पारचर, शटरस्पिड, खडज, व्हाईट बॅलन्स, लार्ज, मेडियम, स्मॉल, फाईन,मेडीयम, बेसिक अशा पद्धतीने चित्रमय माहिती असते. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे,त्याचा मेगाफिक्सल किती सिमॉस किंवा सीसीडी(कॅमेराचा सेंसर)त्याचा साईज किती आहे. बॅटरी कोणत्या प्रकारची व किती कपॅसिटीची आहे,त्याचबरोबर झूम किती आहे,हे पाहणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचे कॅमेरे वापरण्यास सोपे असतात. कॅमेरा हातात धरला व बटन दाबले की,फोटो आपोआपच येतो पण त्यासाठी आपण योग्य शटर स्पीड, पारचर, आयएसओ, व्हाईट बॅलन्स, संपूर्ण विषयाचा किंवा त्या वस्तूवर

ती पडलेली लाईट, त्याचबरोबर फोटोच्या चौकटीमध्ये योग्य पद्धतीने बसवणे व त्याचा फोटो काढावयाचे आहे.त्यामधून तो विषय समजला पाहिजे. फोटोग्राफीच्या संपूर्ण माहिती एखाद्याला आहे पण त्याला एखादा विषय मांडता आला नाही तर तो चांगलाफोटो घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्याकडे चांगला कॅमेरा आहे,चांगली लेन्स आहे. पण त्याला फोटो चांगला काढता येतो असे नाही. त्यासाठी फोटोग्राफीची संपूर्ण तांत्रिक माहिती व त्याचबरोबर कल्पनाशक्तीची सर्वात मोठी गरज आहे. (क्रिएशन)चांगल्याप्रकारे विषय मांडता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने चांगल्या फोटोग्राफरचे भरपूर काम पाहिजे म्हणजे त्याप्रकारे आपली कल्पनाशक्तीही तयार होते. व्यावसायिक फोटोग्राफरने आपल्या काढलेल्या फोटोंचे फावल्या वेळेत बारकाईने निरीक्षण केले पाहिजे काही फोटोग्राफर चांगले फोटो काढतात पण त्याचे निरीक्षण करत नाहीत. एखादा लग्नाचा अल्बम झाला की,ती फाईल एखाद्या महिन्याच्या तारखेमध्ये सेव्ह केली की,त्याकडे कधीच पाहात नाहीत. कधी कधी काम नसते त्यावेळी जुने फोटो पहायला पाहीजेत.

आपल्याला एखादी फ्रेम आवडली की ती वेळीच सेव्ह करावयाची. त्याचबरोबर फोटोग्राफी स्पर्धेमध्ये आपले फोटो पाठवणे गरजेचे आहे. काही फोटोग्राफर असे समजतात की,आपण स्पर्धेत बसणार नाही. पण त्या फोटोची ताकद त्या फोटोग्राफरला नसते. तो स्पर्धेत दिल्यानंतर चांगला विषय किंवा अनेक गोष्टी कळतात. तो फोटो ते सिद्ध करतो. हौशी फोटोग्राफर किंवाव्यावसायिक फोटोग्राफर यांनी कामामध्ये सातत्य व कल्पकता दाखविली तर कोणालाही जागतिक किर्तीच्या फोटोचा मान मिळू शकतो यात शंका नाही. जे शब्दात लिहिता येत नाही,जे बोलण्यातून व्यक्त होत नाही,ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते,छायाचित्रकार म्हणजे तो जो साधे दिसत असलेले दृश्यही बोलके करतो. दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेºयातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले.

तथापि,फोटोग्राफी या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’तशीच आहे. हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र सांगते, असे म्हणतात. छायाचित्र म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू व घटनेची टिपलेली प्रति छायाचित्रणाचा शोध कोणत्याही एका शास्त्रज्ञाने लावलेला आहे, असे म्हणता येणार नाही.या कलेमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांचे यात योगदान आहे. चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दा दा विंची याने वापरला,हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत. या कॅमेºयात सुधारणा करून कागदावर रासायनिक प्रक्रिया करून चित्र उमटवण्याची कल्पना पुढे आली. १७७५ मध्ये जे शुल्झ यांनी सिल्व्हर क्लोराइड प्रकाशामुळे काळे पडते हे दाखवले होते; पण त्यावेळी या माहितीचा उपयोग कसा करायचा याची कल्पना कोणालाच आली नाही. विल्यम लेविस (१७६३), जोसेफ प्रिस्टली (१७७२), के.डब्ल्यू.शेले (१७७७) यांनी यासंबंधी प्रयोग केले.

टॉमस वेजबूड यांनी सिल्व्हर नायट्रेटमध्ये पांढरे कातडे व कागद भिजवून त्यावर सूर्यप्रकाशात पानांची व इतर चित्रे मिळवली. त्याविषयीची माहिती १८०२ मध्ये प्रसिद्ध केली. हेफ्री डेव्ही यांनी सिल्व्हर क्लोराइड प्रकाशाला जास्त संवेदनशील असते असे सुचवले. तथापिवर उल्लेख केलेल्या कॅमेरा आबस्कुराच्या साह्याने छायाचित्र काढण्याचे सर्व प्रयोग जास्त प्रकाशन काल व स्थिर करण्यासाठी लागणाºया रसायनाचा अभाव यामुळे अयशस्वी झाले. कॅमेºयाच्या मदतीशिवाय एका कोरीव कामाचे छायाचित्र घेण्यात झोझफ सिनेफॉर नेप्स यांना १८२२ मध्ये यश आले. हे कायम स्वरूपाचे पहिले छायाचित्र होते. नेप्स यांच्या छायाचित्रांना होलियोग्राफ असे म्हणतात. १८२७ मध्ये त्यांनी लंडन सोसायटीकडे कॅमेरा आबस्कुराने सिल्व्हर क्लोराइडचा थर दिलेल्या कागदावर घेतलेले एक निसर्गचित्र व होलियोग्राफीचे वर्णन पाठवले. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारा सोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला.वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. आपण माहिती पुस्तिका व कॅमेरा हातात घ्यावा त्याप्रमाणे रोज एक तास त्यासाठी काढला की १५ दिवसामध्ये कॅमेरा संपूर्ण समजतो. अशा या जागतिक छायाचित्र दिनी त्या सर्व छायाचित्रकारांना ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने कडून खूप खूप शुभेच्छा…

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.