मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ४६ बस डेपो बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी)२५० पैकी किमान ४६ बस डेपो पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत आणि एमएसआरटीसीचे गत काही काळात १३.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांतील बस संचालनाला या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे, असे एमएसआरटीसीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये २० बसेस जाळण्यात आल्या व १९ बसेसचे नुकसान झाले. बसेसच्या नुकसानीमुळे एमएसआरटीसीला ५.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या आंदोलनांमुळे तिकीट विक्रीत ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एमएस्- ाआरटीसी ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था असून संस्थेच्या ताμयात १५,००० पेक्षा जास्त बसेस आहेत. येथून दररोज सुमारे ६० लाख प्रवासी प्रवास करतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.