साहित्याच्या दरवाढीने बैलपोळ्यावर महागाईची झळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा दि. १४ सप्टेंबर रोज गुरुवारला अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा राजा चा साजशृंगार करण्यासाठी सरसावला असून शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा श्रृंगार साहित्याच्या किंमतीत २० टक्के वाढ दिसून येत आहे. अशा स्थितीतही पोळा दिमाखात साजरा करण्यासाठी शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. शेतात शेतकºयांचा खांद्याला खांदा लावून काळ्या मातीत वर्षभर राबणाºया सर्जा राजाच्या ऋणाची उतरण करण्यासाठी पोळा हा सण शेतकºयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरत आला आहे. अवघ्या एका दिवसांवर म्हणजेच 14 सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठही सजली आहे. बैलांना पोळ्यानिमित्त सजावट करण्यासाठी आकर्षक वस्तू विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. मात्र, यंदा साहित्याच्या किंमती चांगलेच महागले असल्याचे दिसून येत आहे. चवरे, मठ्यांपासून तर झुलांपर्यंत दोर-मोरक्यांपासून तर गळ्यातील माळा व मोरपिसांच्या शिंगोट्यांपर्यंत, घुंगरू माळांपासून तर घंटीमाळांपर्यंत तसेच शिंगांच्या सजावटीसाठी विविध रंगांच्या डब्या आदी साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मात्र, या सर्व साहित्यांच्या कच्च्या मालाची दरवाढ व त्यावर लागलेल्या जीएसटीमुळे बैलांच्या श्रृंगार साहित्य २० टक्क्यांनी महागले आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर महागाईची झळ दिसून येत आहे. नुकताच पाऊस बरसल्याने यापूर्वी चिंतेत असलेल्या शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने आता सर्जाराजासाठी ‘होऊन जाऊ दे खर्च’ म्हणत शेतकरी सर्जाराजाचा साजशृंगार करण्यासाठी सज्ज झाला आहे. बैलपोळ्यानंतर दुसºया दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. तान्हा पोळ्यासाठी बाजारपेठेत लाकडी नंदी विक्रीस आलेले आहेत. मात्र, महागाईचा फटका लाकडी नंदीलाही बसला असून दर गगनाला भिडले आहेत. सध्या बाजारात शंभर रुपयांपासून तर १ हजार रुपयांपर्यंतचे लाकडी नंदीबैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.