राशन दुकानदार महिला व मुलास जातीवाचक शिवीगाळ करणाºया विरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नांदलपार येथील राशन दुकानदार महीलेचे मुलास धक्काबुक्की करून पाहुन घेण्याची धमकी व जातिवाचक शिवीगाळ करणारा विरुद्ध तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपासता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे करीत आहेत. तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार नांदल पार येथील राशन दुकानदार महिला १७ तारखेचे संध्याकाळी ५ वाजता तिरोडा कडे जाण्यास निघाली असता गावातील मंदिरासमोर निलागोंदी येथील विजय जयपाल कटरे हे त्याचा मुलगा व एका व्यक्ततीसह टाटा एस वाहन क्रमांक एम एच १२ डब्ल्यू २६४० सह उभे असता या महिलेने त्यांना तुम्ही माज्या गावातून राशन का घेता असे म्हटले असता संबंधित व्यक्तीने यापुढे मी तुमचे गावातून राशन घेणार नाही असे म्हटले तेव्हा महिलेने तुम्ही गाडी घेऊन वडेगाव पोलीस चौकीला चला असे म्हटले असता तिन्ही व्यक्ती व हि महिला तिचे मुलगा प्रवीण गाडी सह वडेगाव पोलीस चौकीकडे येण्यास निघाले असता वडेगाव जवळील नाल्याजवळ गाडी थांबवून महिलेचे मुलगा प्रवीण यास लोखंडी रॉड घेऊन मारण्यास धाऊन ढकलढुकल करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच फियार्दी महिलेसही जातिवाचक शिविगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून तिरोडा पोलिसांनी भादवि कलम ३२३, ५०४, ५०६ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ३(१)(५) नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.