बावणे कुणबी समाजाची एकता हीच मोठी ताकत- माजी खा.मधुकर कुकडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- बावणे कुणबी समाज मंडळ जिल्हा यवतमाळ च्या वतीने सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने रविवार दिनांक १ आॅक्टोबर २०२३ ला एम.डब्लू. पलेस, वाटाफळे मंगल कार्यालय, जाब रोड यवतमाळ येथे गुणवंतांचा सत्कार, राज्य क्रीडा पुरस्कार कार्यक्रम साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन करून संत तुकाराम महाराज, शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित १५० मान्यवर पाहुणे, खेळाडू क्रीडा क्षेत्र ५०, डॉक्टर, १०,१२ वी, पदवीधर यांचा ट्राफी देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करिष्मा तुमसरे, मनोसरी तुमसरे यवतमाळ यांनी केले. कार्यक्रम मध्ये सर्व समाज बांधव शिस्तिने दिवसभरपासून एकसारखे बसून होते त्याचा मला खूप आनंद झाला. ही शिस्त चांगल्यासंस्कारामुळे मिळते. कुणबी समाजाचे कार्य मोलाचे आहेत.

समाजाच्या सर्व बांधवानी नेहमीच एकत्रित राहा. एकोप्याने राहा, एकजुटीने राहा, सामाजिक बांधिलकी जोपासा, एकमेकांना सहकार्य करा, तुम्ही सर्व सोबत होते म्हणून मी खासदार होऊ शकलो, मला समाजाची सेवा करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र नव्हे तर सम्पूर्ण देशात बावणे कुणबी समाज बांधव मोठया संख्येने आहेत. बावणे कुणबी समाजाची एकता हीच मोठी ताकत आहे, असे आपल्या मार्गदर्शनात भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी खा.मधुकर कुकडे यांनी मार्गदर्शनात सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त मुख्याध्यापक शा.आ. शाळा प्रकल्प पांढरकवडा श्रीकृष्ण वाघाये,

विशेष अतिथी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी खा.मधुकर कुकडे,कार्यक्रमाचे उद्घाटक विनायक बुरडे उपसभापती कृ.उ.बाजार समिती लाखनी, प्रमुख पाहुणे वरठी जि.प.सदस्य एकनाथ फेंडर, बेटाळा जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, आमगाव जि.प.सदस्य विनोद बांते, खापा जि.प.सदस्य दिलीप सार्वे, मुख्य अधिकारी अंजनगाव सुर्जी प्रशांत उरकुडे, उमेश मोहतुरे बावणे कुणबी समाज युवा समिती अध्यक्ष भंडारा, गजानन झंझाळ, निलकंठ कायते, विलास बांडेबूचे, आशिष कुकडे, शरद तितीरमारे, महादेव बुरडे, देवा पचघरे, सतिश बोन्द्रे, महेश खराबे, अशोक हजारे, विष्णुपंत कांबे अध्यक्ष अमरावती, मोहन तितीरमारे दारव्हा, दादाराव कांबळे कोलबाई, रमेश मते खोपडी, अशोक ठवकर बोरी, योगेश निमकर बडनेरा, भंडारा, नागपूर, मुंबई, अमरावती, यवतमाळ, दारव्हा, अकोला, बडनेरा, चांदुर बाजार, नेर, चंद्रपूर, वणी, वर्धा, वाशीम येथील समाज बांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.