प्लाज्मा दान ही चळवळ व्हावी- चरण वाघमारे

प्रतिनिधी भंडारा : सध्या जगासह भारतभर व महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कोरोना च्या भीषण उद्रेकामुळे अनेकांना जीव गमवावे लागले असुन यापासून पॉझिटिव्ह रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्लाज्मा दान ही चळवळ उभी व्हावी या हेतूने विकास फाउंडेशन भंडारा च्या वतीने आज दि.१७ आॅक्टोंबर रोजी तुमसर येथे प्लाज्मा व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यात मोठ्या संख्येने सहभागी होेण्याचे आवाहन माजी आमदार तथा विकास फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चरण वाघमारे यांनी केले आहे

सध्या महाराष्ट्रातील कोरोना कोव्हिडं १९ चा प्रादुर्भाव पाहता जनतेत भीतीचे भयंकर वातावरण निर्माण झाले आहे, या विषाणूमुळे तरुण, बालक, महिला व वयस्क अशा सर्वच स्तरातील लोकांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला असून त्यामुळेच कुटुंब उध्वस्त होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे, अशा महाभयंकर परिस्थितीत शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना सर्वसामान्य लोकांवर कर्जबाजारी होऊन कुटुंबावर भीषण आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आल्यानंतरही रूग्ण बरा होऊन घरी परतयेईल अशी अपेक्षा सुद्धा करता येत नाही त्यामुळे प्लाज्मा दान करून आपण त्यावर मात करून समाजाचे ऋण फेडू शकतो हा उदात्त हेतू ठेवून विकास फाउंडेशन भंडारा संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी कोरोना संक्रमनातून बरे होऊन स्वत: प्लाज्मा दान करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे

कोरोना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शेवटचा उपाय म्हणजे प्लाज्मा दान, याकरिता कोरोना आजा- रातून बरे झाले आहे अश्यांच्या शरीरात अँटिबॉडीज फार मोठया प्रमाणात उपलब्ध झालेल्या असतात, त्यामुळे प्लाज्मा दिल्याने शरीरावर कोणताही दुष्परिणाम न होता या अँटिबॉडीज ची भर २४ तासात होते. एका प्लाज्मा दानामुळे दोन रुग्णांचे जीव वाचविणे शक्य आहे. याचं अनुभवातून चरण वाघमारे यांनी स्वत: प्लाज्मा दान केला असून अनेक रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्लाज्मा व रक्तदान ही जनतेकरिता चळवळ उभी व्हावी म्हणून विकास फाउंडेशन भंडारा चे वतीने तुमसर कार्यालयात सकाळी ११ ते २ या वेळेत शिबीर आयोजित केला आहे. यामध्ये कोरोना आजारातून बरे झाले ल्या व्यक्तींनी प्लाज्मा तपासणी तसेच इतरांनी रक्तदान करण्यास सहभाग नोंदविण्याचे आवाहन माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *