विजयादशमीनिमित्ताने मोहाडीत रावणपुतळ्याची जय्यत तयारी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवी मंदिरासमोर वाहत असलेल्या श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या पात्रात दरवर्षी विजयादशमीनिमित्ताने रावणदहन उत्सव कार्यक्रम करण्यात येतो. या रावणदहन कार्यक्रमसाठी मोहाडी परिसरातील असलेल्या गावातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. विद्यार्थी युवक दुर्गा उत्सव मंडळ गांधी चौक मोहाडीच्या वतीने एक लाख भाविकांकरिता भव्यदिव्य महाप्रसाद जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात विजयादशमी मंगळवार दि.२४ आॅक्टोबर २०२३ ला दुपारी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत होत असतो. भव्य महाप्रसाद आणि रावणदहन कार्यक्रम मागील दोनवर्षांपूर्वी कोरोनाची लाट असल्याने रद्द करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रम एकमेकांना लागून असल्याने यानिमित्ताने एक लाख भाविक यानिमित्ताने सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीचे दर्शन करण्यासाठी येतात. यावर्षी विजयादशमी मंगळवार दि.२४ आॅक्टोबर २०२३ आली असून अवघे एक आठवडे शिल्लक असूनसुद्धा रावणदहन उत्सव समितीने कुठल्याही प्रकारची हालचाल केली नसल्याने विजयादशमीला रावणदहन उत्सव होणार की नाही? याकडे दुकानदारमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. जर रावणदहन उत्सव होत नसेल तर सुप्रसिद्ध जागृत माँ चौंडेस्वरी देवी मंदिर परिसरात दुकान लाऊन काहीच फायदा होणार नाही.

नवरात्र उत्सवात जेवढी कमाई होत नाही. तेवढी कमाई रावणदहन आणि भव्य महाप्रसाद असल्याने विजयादशमीला होत असते. आजही मोहाडी येथील त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम म्हणजे विजयादशमी उत्सव जिल्हात प्रसिद्धीच्या झोतात आहे. केंद्रीय रस्ते व इन्फ्रास्ट्रक्चर निधीमध्ये सडक परिवहन मंत्रालय केंद्र सरकारच्या मंजुरीने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिवामार्फत ८० कोटी रुपयांचे रोहा-मुंढरी येथे वैनगँगा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा यावर्षी शुक्रवार दि.२६ मे २०२३ ला दुपारी ४.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने करण्यात आले होते. रोहा-मुंढरी पुलाने मोहाडी १३ किमी तर तुमसरचे अंतर १७ किमी पडणार आहे. तत्कालीन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार अनिल फत्तुजी बावणकर यांनी आपल्या निधीतून रावणदहन कार्यक्रमासाठी सभामंडप तयार करून दिले आहे. यावर्षी जर विजयीदशमीला मोहाडीत भव्य महा प्रसाद आणि रावणदहन असल्याने तर माता चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी करडी परिसरातील २५ गावातील गावकरी रोहा-मुंढरीपुलावरून येऊन हा त्रिवेणीसंगमाचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नक्कीच गर्दी होईल. रावणपुतळा तयार करण्यासाठी मोहाडी तालुक्यातील मोरगाव येथील कैलास ढबाले, विशाल नाना हारगुडे, मंगेश रामप्रसाद टांगले, राहुल मनोहर हेडाऊ, रवी बंडू वलथरे, संजय महादेव शिंगाडे परिश्रम घेत आहेत. दसरा उत्सव मंडळ मोहाडीच्या वतीने श्री चौंडेश्वरी माता मंदीरच्या नदीतिरावर होईल. यावर्षी अध्यक्ष सुभाष गायधने, उपाध्यक्ष पिंटु तरारे, कोषाध्यक्ष विकास कारेमोरे, सहकोषाध्यक्ष सुभाष भाजीपाले, सचिव मनोहर हेडाऊ, सहसचिव नितीन मारबते, कार्य.सदस्य पवन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. याप्रसंगी तेजस मोहतुरे, शंकर भुते, आदर्श बडवाईक, गणेश निपाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.