धान उत्पादक शेतकºयांना तात्काळ दहा हजाराची आर्थिक मदत द्या!

भंडारा : जिल्ह्यातील धान पिकांवर मोठया प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव झाला असुन शेतकरी संकटात सापडला आहे करीता धान उत्पादक शेतकºयांना तात्काळ दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी बीआरएस चे पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत केली. शासनाच्या मानव विकास योजनेमध्ये मोठया प्रमाणात घोळ करण्यात आला असुन त्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी यासह निराधारांचे रखडलेले मानधनाचे तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणीही यावेळी चरण वाघमारे यांनी यावेळी केली. जिल्ह्यात धान पिकांवर मोठया प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन त्यावर कोणतेही औषध फवारणी केली तरी ती निष्फळ ठरीत आहेत. यासंदर्भात काही शेतकºयांनी भंडारा जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन मदतीची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी शेतकºयांना पिक विम्याकरीता आॅनलाईन अर्ज करण्यास सांगीतले. मात्र पिक विमा योजनेत पिकांवर अळीचा प्रदुर्भाव झाल्यास कुठल्याही प्रकारचा विम्याचा लाभ शेतकºयांना मिळत नाही असा नियम आहे. तेलंगणा राज्यात शेतपिकांवरअशीच परिस्थिती निर्माण झाली असता कुठलेही पंचनामे न करता राज्य सरकारने तात्काळ एकरी १० हजार रुपये आर्थिक मदत शेतकºयांना दिली.त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्य सरकारने सुध्दा धान उत्पादक शेतकºयांना एकरी १० हजार रूपयाची सरसकट मदत करावी अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली.

जिल्ह्यातील पाच तालुक्यात मानव विकास योजनेतुन शेतकºयांना ट्रॅक्टरसह शेतीचे साहित्य वाटप करण्यात आले.शासनाच्या प्रचलीत पध्दतीनुसार डीबीटी योजनेतुन आॅनलाईन अर्ज करावयाचे होते मात्र प्रत्यक्षात आपल्या मजीर्तील लोकांना योजनेचा लाभ मिळावा याकरीता आॅफलाईन अर्ज घेण्यात आले.वेळेवर शेतकºयांचे गट नोंदणी करून त्याच लोकांना पुर्णपणे नियम धाब्यावर बसवुन एकाच कंपनीचे ट्रॅक्टर सहित शेतीचे साहित्य वाटप करण्यात आले. सदर योजनेला जिल्हाधिकाºयांनी मान्यता दिल्याने त्यांचे या योजनेवर नियंत्रण असणे गरजेचे होते मात्र तसे दिसुन आले नाही.यासंदर्भात आपण राज्याच्या संचालकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगीतले की,यायोजनेला जिल्हाधिकारी यांनीच मान्यता दिल्याने याची चौकशी व कारवाईसुध्दा जिल्हाधिकारी यांनी करावयाची आहे. मात्र तरीसुध्दा यामध्ये शासकीय नियम मोडल्याचे दिसुन आल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मानव विकास योजना हि महाराष्ट्रातील एकमेव योजना असेल की ज्यामध्ये आपल्या मजीर्तील लोकांना लाभ देण्याकरीता आॅफलाईन अर्ज स्विकारण्यात आले. प्रत्यक्ष माहिती घेतली असता असे दिसुन आले की,लाभार्थी असलेल्या काही शेतकरी गटाच्या कार्यालयात सदर ट्रॅक्टर व साहित्य उपलब्ध नसुन त्याची विक्री करण्यात आल्याचा आरोपही चरण वाघमारे यांनी यावेळी केला. मागील तीन-चार महिन्यांपासुन जिल्ह्यातील निराधारांना निराधार योजनेचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे निराधारांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे.करीता निराधारांना तात्काळ मानधन देण्यात यावे अशी मागणी चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतुन केली. पत्रकार परिषदेला बीआरएस नेते प्रकाश महालगावे,शिनसेना नेते प्रशांत लांजेवार,शेतकरी संघर्ष संघटनेचे चंद्रशेखर भिवगडे,धान उत्पादक शेतकरी विष्णुदास लोणारे,पुरूषोत्तम गायधने,राधोश्याम आस्वले,रतिराम भेदे,आसाराम सेलोकर यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.