भाडेपट्टे देण्याची कार्यवाही सुरू

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महापालिका यांच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येऊन भाडेपट्टे देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रवीण दटके, चंद्रशखर बावनकुळे, निलय नाईक यांनी नियम १०१ नुसार लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उदय सामंत यांनी सांगितले की, नागपूर महापालिका क्षेत्रात एकूण ४२६ झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी २९८ झोपडपट्ट्या घोषित तसेच १२८ अघोषित आहेत. यापैकी महापालिकेच्या १५, महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ७२, नासुप्र ६९, मिश्र मालकीच्या जागेवर ८४, खाजगी ८२, झुडपी डंगल १५ मालकी मकबुजा ६०, डॉ. पंदेकृवि ४, रेल्वे १२, नागपूर विद्यापीठ ३, कार्गो हब १, नाग नाला जागेवर ९ झोपडपट्ट्या आहेत. महापालिकेच्या जागेवरील १५ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण महापालिकेने पूर्ण केले असून यानुसार ४८६५ झोपडीधारकांपैकी २२९८ झोपडीधारकांनी पात्रतेची पूर्ण कागदपत्रे सादर केली. त्यांना स्टॅम्प ड्युटी भरण्याबाबत मागणी पत्र देण्यात आले.

१८३९ अतिक मित झोपडीधारकांनी स्टॅम्प ड्युटी भरली असून त्या सर्वांना पंजीबद्ध भाडेपट्टा करून देण्यात आला आहे. नासुप्रच्या जागेवरील ६९ झोपडपट्ट्यांतर्गत ४३५२ पट्टे वाटपाची कार्यवाही करण्यात आली. शासन मालकीच्या जागेवरील ४९ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या अतिक्रमणधारकांना जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे पट्टे वाटपाची कार्यवाही सुरू आहे. नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेतील खाजगी जागेवर असलेल्या अस्तित्वातील अतिक्रमित झोपडपट्ट्यांची जागा ‘बेघरांसाठी घरे’ अथवा ‘जनतेसाठी घरे’ या प्रयोजनासाठी आरक्षित करण्याबाबत अधिसूचना निर्गमित झाली आहे. खाजगी जागेवरील अधिसूचित झोपडपट्ट्याखालील क्षेत्रासाठी मूळ जागाधारकांकडून टीडीआर मागणीच्या प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत तरतुदीनुसार कार्यवाही करून खाजगी जागा महापालिकेकडून ताब्यात घेण्यात येईल व तद्नंतर पट्टे वाटपाची कार्यवाही करण्यात येईल. झुडपी जंगलाच्या जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे, अशी माहिती देण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *