भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या निवडणूक गीताबाबत निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे. आपल्या निवडणूक गीतातून ‘भवानी’ हा शब्द काढणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोग कारवाई करू शकतो, पण ते हे शब्द काढणार नाहीत, असे उद्धव यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने आधी ) पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर कारवाई करावी, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटले आहे. उद्धव गटाने निवडणूक प्रचारासाठी पक्षाचे मशाल गीत (प्रचार गीत) प्रसिद्ध केले. ज्यामध्ये ‘भवानी’ शब्दाचा उल्लेख आहे.
‘भवानी’ शब्दाच्या उल्लेखावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस पाठवली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणासाधला आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसºया टप्प्याच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आता चर्चा होत नाही. रामाच्या नावावर मते मागितली जात आहेत. हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे. त्यांच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. आमचे पंतप्रधान ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करू म्हणाले आणि अमित शाहांनी रामाच्या नावाने मते मागितली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.