भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लग्नकार्यात आपण लाखो रुपयाची उधळण करतो. याकरिता अनेकजण कर्ज काढून मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न करतात. लग्न आटोपल्यानंतर कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी धावपड व मानसिक त्रास सहन करावा लागतो. असे न करता नागरिकांनी समजूतदारपणा दाखवून आपल्या पाल्यांची लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करून वेळेची व भविष्याकरिता पैशाची बचत करावी. पैशाची बचत हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले. स्मार्टग्राम हरदोली (झं) येथे २० एप्रिल रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ.राजू कारेमोरे तर अध्यक्षस्थानी नाना पंचबुधे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मधुकर कुकडे, भाऊराव तुमसरे, जि.प. सदस्य महादेव पचघरे,
आनंद मलेवार, देवा इलमे, पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, धनेंद्र तूरकर, प्रल्हाद किंमतकर, छगन बिल्लोरे, प्रमोद तितीरमारे, के.के.पंचबुधे, शंकर राऊत, बाबुराव मते, ग्रामसेवक गोपाल बुरडे, प्रतिमा निखाडे, प्रदीप बुराडे, परमेश्वर नलगोपुलवार, हिमांशू मते, संजय मते, ओमप्रकाश चोले, सुरेश घरजारे, अरुण माटे, विजय झंझाड, ईश्वर माटे, मंगेश धांडे, देवदास बोंद्रे, मधुकर भोपे, राजू सोयाम, शंकर राऊत, हरदोलीचे सरपंच अल्का झंझाड, उपसरपंच मोहपत झंझाड, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बांते, अतूल फेंडर, निशा झंझाड, दिक्षा माटे, भाग्यश्री धांडे व आदी मान्यवर होते. या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात तीन वर-वधू विवाह बंधनात अडकले. त्यांना लता धांडे स्मृतीप्रित्यर्थ जीवनावश्यक पाच भांडे भेट देण्यात आले. तर ग्रामपंचायत कार्यालयाकडून वधू ला माहेरची साडी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गुणवंत झंझाड व गोपाल बुरडे यांनी केले. प्रास्ताविक सदाशिव ढेंगे यांनी तर आभार प्रदर्शन पोलिस पाटील पंढरीनाथ झंझाड यांनी केले. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सोहळा आयोजन समितीचे सदस्य व ग्रामवासीयांनी प्रयत्न केले.