शेती नांगरणीचा खर्च वाढला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : खरीपपूर्व मशागतीची कामे हळूहळू सुरु होत आहेत. सध्या तापमान वाढल्याने शेतीकामांना जणू विश्रांतीच देण्यात आली आहे. मात्र हळूहळू मशागतीची कामे काही ठिकाणी होताना दिसून येत आहे. यंदा मात्र डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचे भाडे प्रतितास एक हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदा सतत वातावरण बदल होऊन अवकाळी पाऊस बरसत आहे. भ्ंडारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत योग्य ओलावा निर्माण झाला आहे. खरीप व रब्बी पीक निघाल्यावर शेतकरी शेतजमीन नांगरणी करून ठेवत असतात. त्यामुळे नांगरणी केली जात आहे.

सध्या शेतातील कामे सर्रास ट्रॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात रोजगार उपलब्ध होऊन चार पैसे पदरी पडताना दिसून येत आहेत. रब्बी हंगाम संपल्यावर शेतातील पाºया, धुºयाची दुरुस्ती करीत असतात. सकाळच्या सुमारास शेतशिवारात ट्रॅक्टरचे सूर कानी पडत आहेत. मात्र डिझेलच्या दरवाढीने ट्रॅक्टरने नांगरणी करणे अनेक शेतकºयांच्या अवाक्याबाहेर झाले आहे. प्रतितास एक हजार रुपये भाडेद्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नांगरणीचे दर वाढल्याने काही शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने कामे करीत आहेत. काही शेतकरी कापूस पिकाची लागवड केलेल्या शेत जमिनीची साफसफाई करून नांगरणी योग्य शेतजमीन तयार करताना दिसून येत आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेती महागली, अशी प्रतिक्रिया एकोडी येथील पुंजिराम कापगते या शेतकºयाने व्यक्त केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *