उल्हास तिरपुडे भंडारा : मतदान आटोपताच आता आकड्यांचा आणि टक्क्यांचा खेळ भंडारा-गोंदियामध्ये सुरू झाला आहे. त्यावरून वेगवगेळे अंदाज वर्तविले जात आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे. उमेदवारांच्या मताधिक्याबाबत शंकाही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळणाºया मतांचा टक्का घसरला हे विशेष. भाजपाचे सुनिल मेंढे यांनी मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे नाना पंचबुधे यांना पराभूत केले होते. त्यावेळी सुमारे १ लाख ९७ हजार ३९४ मताधिक्य त्यांनी घेतले होते. यावेळी मेंढे यांनी ४ लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला आहे. मात्र मतदानाच्या टक्केवारीत अवघी १.७७ टक्केच घसरण झाली आहे. तसेच डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासाठी एकत्र आलेले काँग्रेसचे नेते, दलित व मुस्लिमांसोबतच तेली समाजाची नाराजी बघता मताधिक्याबाबत आताच बोलणे अवघड असल्याचे बोलले जात असून भंडारा-गोंदिया लोकसभेचा खासदार महायुतीचा की महाआघाडीचा हे दिड महिन्यानंतरच कळणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक संपली. मतमोजणी व निकालासाठी दीड महिना प्रतिक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत समीकरण व मताची आकडेवारी, जुळवाजुळवीमध्ये उमेदवारांसोबतच नेते, कार्यकर्ते व मतदारांमधे प्रचंड उत्सुकता लागली आहे.
मतदानाच्या टक्केवारीत केवळ १.७७ टक्केच घसरण झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दरवेळी निवडणूक निकालाचे समीकरण बदलविणारा निर्वाचण क्षेत्र म्हणून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राकडे पाहीले जाते. १९ एप्रिलला या लोकसभा क्षेत्रातून १८ उमेदवारांचे खासदार होण्याचे भविष्य मशिनबध्द झाले. महाआघाडीकडून कॉग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे व भाजपा महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यात खरी लढत झाली असून वंचित, बसपा व अपक्ष उमेदवार पाहीजे त्या प्रमाणात छाप पाडू न शकल्याच्या चर्चा मतदारांमध्ये आहे. खा स दा र ? विद्यमान खासदार यांनी सबका साथ सबका विकास, अबकी बार चारसौ पारचा नारा लावत मतांचा जोगवा मागितला तर काँग्रेस महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे यांनी काँग्रेस व नाना पटोले यांचे नावांनी मतांचा जोगवा मागीतला.
महायुतीच्या उमेदवारासाठी मोठ्या प्रमाणात सहयोगी पक्षांचा पाठिंबा, भाजपाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा, आजीमाजी आमदार, मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्या जाहीर सभा, कार्नर सभा, पदयात्रा, दोन्ही जिल्ह्यातील जिप, पंस लोकप्रतितीनिधीसह शेकडो कार्यकर्त्यांचा मेळ व सहभाग ही जमेची बाजू. तर काँग्रेस महा- विकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासाठी केवळ राहूल गांधी यांची एकमेव मोठी सभा वगळता कुठल्याही कार्नर सभा नाही, पदयात्रा नाही. केवळ काँॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकाकी किल्ला लढवला. मतदानानंतर महायुतीतर्फे विजयाचा विश्वास तर महाआघाड- ीकडून विजयाची खात्री दिली जातआहे. असे असले तरी महायुती व महाविकास आघाडीमध्येच टक्कर असून केवळ ३० ते ५० हजाराच्या मतांची आघाडी घेऊन विजयाची माळ कुणा एकाच्या गळ्यात पडेल अशी चर्चा आहे. चर्चा, अदांज कितीही असल्या तरी मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यावरच भंडारागोंदिया लोकसभेचा खासदार महायुतीचा की महाआघाडीचा? हे कळणार आहे.