भंडारा पत्रिका/वार्ताहर वाकेश्वर : भंडारा तालुक्यातील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहेला येथे संस्थासचिव रामदास शहारे यांच्या अध्यक्षतेत व संस्था सहसचिव सुदाम खंडाईत यांच्या हस्ते ग्रीष्मकालिन कला व क्रीडा शिबीराचा उद्धाटन सोहळ संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथीमध्ये पोलीस पाटील चंद्रशेखर खराबे, शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष देवचंद हजारे, प्र. प्राचार्य वाय. एन. काटेखाये, प्रा. व्ही. एल. हटवार, प्रा. एस. व्ही. गोंडाणे, प्रा. एस. एस. भूरे, क्रीडाशिक्षक डी. बी. टेकाम, करूणा कावडे, पुष्पा काटेखाये प्रामुख्याने उपस्थित होते.
या कला क्रीडा शिबीरात रग्बी, बुद्धीबळ, योगा, टारगेट बॉल, डॉज बॉल, चित्रकला, झुंबा डान्स, मेहंदी कला, शिल्पकला आदिचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर २२ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत होणार आहे. दररोज हे प्रशिक्षण सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळात दोन सत्रात होणार आहे. विद्यार्थांच्या अंगी उपजत असलेल्या सुप्त कलागुणांना विकसित करण्यासाठी आयोजीत या ग्रीष्मकालीन कला व क्रीडा शिबीराला प्रशिक्षक म्हणून क्रीडा शिक्षक डी. बी. टेकाम, डी. एन. बावणे, एल. एच. कुंभलकर, पुष्पा काटेखाये, करूणा कावडे, सुरजकुंवर मडावी, शुभांगी खोब्रागडे, मिनल निर्वाण, सरीता बोधाने, भगवान उकरे, दिनेश पंचबुद्धे प्रामुख्याने प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणात १५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.