भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आरटीई अंतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू झाली. जिल्ह्यातील १२२५ शाळांमध्ये १४३३८ मुलांना नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील बालकांच्या पालकांना ३० एप्रिलपर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करताना हवाई अंतर, त्यासाठी रेड बलूनची सदोष पद्धती, पयार्यात दिसणाºया एक किमीपर्यंतच्याच शाळा, भरावी लागणारी अन्य किचकट माहिती इत्यादी कारणांमुळे बालकांचा प्रवेश अर्ज भरताना पालकांचा मोठा गोंधळ उडत आहे. शिवाय आपल्याला हवी असलेली शाळा आॅनलाईन पर्यायतच दिसत नसल्याने पालकांमधून या प्रक्रियेतबाबत मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. अर्जात बालकांचा तसेच स्वत: चा आवश्यक असलेला माहितीचा तपशील भरून द्यावा लागत आहे. शिवाय यावर्र्षीपासून पालकांना हवी असलेली शाळा पर्यायात दिसत नसल्याची ओरड सुरू झाली आहे.
नवीन धोरणानुसार आपल्या घरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शाळांचाच आॅनलाईन अर्ज भरताना पर्याय दिसत आहे. फळए त्यामुळे यापैकी एकाच शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार असल्याने या प्रक्रियेवर आणि धोरणावर पालकांकडून बोट ठेवले जात आहे. तसेच रहिवाशी ठिकाण आणि शाळेच्या दरम्यानचे रस्त्याने जरी अंतर जास्त दिसत असले तरी या प्रक्रियेत रेड बलुनद्वारे हवाई अंतर गाह्य धरले जाणार आहे. त्यामुळे पालकांची इच्छा असूनही त्यांना आपल्या पालकांना शहरातील किंवा घरापासूनच्या एक किमी पेक्षा दूरवरील नामांकित शाळेत प्रवेश घेता येणार नाही. यामुळे ग्रामीण भागातील तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेमध्ये शिकता येणार नाही एवढे मात्र निश्चित म्हणता येईल. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण नि: शुल्क आहे मग आरटीईचा उपयोग काय? अर्ज करण्यासाठी कागदपत्रे लागतात पण जिपच्या शाळांमध्ये शिक्षण मोफत व आॅफलाइन प्रवेश होतो. मग हा अट्टाहास कशाला, असा प्रश्?न पालकांनी उपस्थित केला आहे.