भरधाव कारने मोटरसायकलला उडवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा पवनी मार्गावरील कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालगाव येथे भरधाव कारने मोटर सायकलला जबर धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा भंडारा येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दिनांक २२ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडली. कुणाल सुरमवार वय ३० रा. अड्याळ असे मृताचे नाव आहे. तर दिनेश वसंत बागडे रा. किटाडी वय २८ असे जखमीचे नाव आहे. दिनेश बागडे हे पवनी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. भंडारा येथे काही कार्यालयीन कामानिमित्त ते आपला मित्र कुणाल याच्यासह पोलीस विभागाच्या दुचाकी क्र एमएच १२ व्हिएस ०९८५ मोटरसायकलने आले होते. कार्यालयीन काम आटपून ते परतीच्या प्रवासात असताना हा अपघात घडला. भंडाºयावरूनपवनीकडे मोटरसायकलने जात असताना पालगाव येथे विरुद्ध दिशेने येणाºया भरधाव चार चाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत हे दोघेही दुचाकी स्वार मोटरसायकल वरून रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर रित्या जखमी झाले तर त्यांच्या दुचाकीचे सुद्धा नुकसान झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेली कार शेजारच्या नाल्यात जाऊन कोसळली. सुदैवाने वाहन चालविणाºया व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघात घडतात घटनास्थळी मोठ्या संख्येने गावकºयांनी धाव घेतली.

या अपघाताची माहिती तातडीने कारधा पोलीस स्टेशनला देण्यात आली. कारधा पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत. नरेंद्राचार्य संस्थांनच्या रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारणकेले. कारधा पोलीस व रुग्णवाहिका घेऊन चालक प्रमोद मोहतुरे घटनास्थळी पोहोचले. तातडीने जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी दिनेश बागडे व त्यांचे मित्र कुणाल सुरमवार या दोघांनाही नरेंद्राचार्य संस्थांनच्या रुग्णवाहिकेतून चालक प्रमोद मोहतुरे यांनी पोलीस व गावकºयांच्या मदतीने डॉक्टर व्यास यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुणाल याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे उपचारादरम्यान काही वेळातच त्याने प्राण सोडले. तर दिनेश बागडे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *