तुमसर : तालुक्यातील पवनारा (चिचोली) जवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाºया दुचाकीला अमोरासमोर धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघांच्या जागीच मृत्यू तर तिसरा गंभीर जखमी झाला, ही घटना मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. विजय धुर्वे (२६) रा. चिखला (म. प्र.), तुफान उईके (४५)रा. टेकाळी सुकळी (म. प्र.) असे मृतकाचे नाव तर शैलेश वट्टी (४०) रा. चिखला (म. प्र.) गंभीर जखमी झाले असून उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. १६ टायरच्या ट्रकमध्ये मॅग्नीजचे पावडर भरलेला होता.
पुढील तपास तुमसर पो.उप.नि. कोल्हे करीत. तुमसर- नाकाडोंगरी रोडवरील पवनाराजवळ ट्रक क्रमांक सीजी ०८ एएक्स ८१२२ याने समोरून येणाºया दुचाकीला धडक दिली. बांधकाम मजूर म्हणून ते कामाला नागपूर इथे होते. नागपूर इथून दुचाकीने (एमपी ५० सीएस ६१३४) ट्रिपल सीट स्वगावी चिखली (मध्यप्रदेश) येथे नाकाडोंगरी तुमसर मार्गे जात होते. या मार्गावर दुचाकी, लहान गाड्या व पायी चालणाºयांना मोठ्या वाहनांपासून अपघाताची शक्यता खूप वाढली असून पोलिस विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अपघात झाला त्यावेळी परिसरात वादळी वाºयासह विजेच्या कडकडाट व जोरदार पाऊस सुरू असल्याने अपघातस्थळी बचाव कार्य करण्याकरिता अडचणी निर्माण झाले होते.