भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस हिवताप आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये “जागतिक हिवताप दिन”म्हणून साजरा केला जातो.हिवतापाच्या समूळ उच्चटणासाठी जागतिक पातळीवर अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात. हिवतापाची कारणे,उपचार आणि प्रतिबंधात्मक उपांयाबद्दल संपूर्ण जगभर सामाजिक जागृती करणे आणि हिवतापाविरुद्ध चालविलेल्या मोहिमेचा आढावा घेणे, ही जागतिकहिवताप दिन साजरा करण्यासाठी उद्दिष्टे ठरवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण आजच्या दिनी माहिती दिली आहे.
सहसंचालक हिवताप व हत्तीरोग पुणे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर विविध जनजागृतीपरकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. दि.२५ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हिवताप विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी एम.बी.बी.एस.च्या प्रथम वगार्तील प्रशिक्षणार्थींना हिवतापाची कारणे, उपचार, प्रतिबंधात्मक उपांयाबद्दल शासनाचे धोरण, औषध पॉलिसीअशा विविध बाबीची माहीती देवुन जनजागृती करण्यात आली. जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हिवताप जनजागृती कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी किशोर भालेराव, आरोग्य पर्यवेक्षक श्री.डोंगरे, श्री.ठाकूर, श्री.भगत,श्री. जायभाय, श्री.दिपवादे, श्री.आशिश बले,श्री.पंकज गजभिये,वर्षा भावे यांचे सह आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा सहभाग होता.