भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार, अशी भाषणाला सुरुवात करतील आणि तिसºयांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याची साद घालतील. मात्र, त्यांना देशाच्या विकासासाठी नव्हे, तर संविधान बदलण्यासाठी तिसºयांना पंतप्रधान व्हायचे आहे. त्यासाठीच लोकसभेत चारशे जागाहव्या असल्याची टीका शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेतून केली. बारामती मतदारसंघातील सास्- ावड येथील पालखी मैदानावर रविवारी आयोजित जनसभेत बोलताना ते म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. आठ महिन्यांपूर्वी माज्याबद्दल त्यांचे वेगळे मत होते. मात्र, आमाच्यातील काही लोक त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली.मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, त्याबाबत चिंता आहे. महापालिका, पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या नाही. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेतली जाते. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. जनतेने त्यांच्या मनातील समजून घ्यायला हवे. संविधान बदलण्यासाठी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी चारशे पारचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे.