भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : लाखनी शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या मागणीवरून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले, मात्र बांधकाम केलेल्या उड्डाणपुलावर तांत्रिक दोष आल्यामुळे उड्डाणपूल काही दिवसांसाठी बंद करण्यात आला होता तर भंडारा शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे लाखनीकडून भंडाºयाकडे जाणारी वाहतूक जिल्हा प्रशासनाने केसलवाडा फाटा मार्गे वळवली असल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसापासून शहरात वाहतुकीची कोंडी होत असून अवजड वाहन चालकांना तासनतास एकाच ठिकाणी उभे राहावे लागत आहे तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीमुळे भंडारा कडे प्रवास करणाºया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर उड्डाणपूलावरून भंडाºयाकडून साकोलीकडे जाणाºया लेन वरून वाहतूक सुरू असल्यामुळे साकोलीकडून भंडाºयाकडे जाणारी वाहतूक उड्डाणपुलाच्या खालूनच सुरू असल्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून भंडाराकडे जाणारे उड्डाण पुलावरून विरुद्ध दिशेने तसेच उड्डाणपुलाखालूनही विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्यामुळे शहरातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे ही विरुद्ध दिशेने भरधाव होणारी वाहतूक नागरिकांचा अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे याची प्रशासनाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली असून वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून शैक्षणिक व्यावसायिक व शासकीय महत्त्वाचे केंद्र आहे लाखनी शहरात आजूबाजूच्या गावातील व परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नागरिक आपल्या शिक्षणासाठी व दैनंदिन कामासाठी लाखनी येथे दाखल होत असतात शहरात शासकीय कार्यालय व बँका यांना पार्किंग सुविधा नसल्यामुळे सर्विस रोडवरच नागरिक आपली वाहने पार्किंग करीत असतात तसेच सर्विस रोडच्या सुरुवातीपासूनच अतिक्रमण असल्यामुळे नागरिकांना सर्विस रोड वरून पायी चालणे ही कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना महामागार्चा अवलंब करावा लागत असतो शहरात अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे दिव्यांगत्व आले. मात्र प्रशासन नागरिकांच्या हितासाठी कोणतेही पावले उचलताना दिसून येत नाही.