भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुजबी ते भंडारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मुरूम पसरविण्याचे काम सुरू आहे परंतु दोषपूर्ण कामामुळे खड्डयांची परिस्थिती जैसेथेच आहे. सदर कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली आहे.सदर काम करतेवेळी निकृष्ट मुरूमाचा वापर केल्याने रस्त्याच्या कडेला मोठमोठे दगड पसरविण्यात आल्याने या ठिकाणी अपघात होत असुन प्रवाशी नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे.तरी या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी काही सुजान नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. मुजबी ते भंडारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगत अनेक नागरी वस्त्या असुन ७ शाळा सुध्दा आहेत. या मार्गावरील डांबरी रस्त्यालगत मोठे खड्डे पडल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर प्रशासन जागे झाले व कामाला सुरूवात झाली. परंतु सदर मुरूम पसरविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे.
सदर कामात अत्यंत कमी प्रमाणात निकृष्ट दर्जाचा मातियुक्त मुरूम पसरविण्यात आले आहे.तसेच मुरूम पसरविल्यानंतर पाणी टाकुन त्यावर रोलर सुध्दा फिरविण्यात आलेला नाही. त्यामुळे मुरूम रस्त्यालगत अनेकठिकाणी पसरून प्रवाशी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढले आहे.करीता दोषी अधिकारी व काम करणाºया कंत्राटदाराची विभागीय चौकशी करण्यात यावी तसेच सदर रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.मागणी पुर्ण न झाल्यास ७ मे रोजी राष्टÑीय महामार्गावर रास्तारोका आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदन देतांना बालु ठवकर, प्रवीण उदापूरे, दुर्गेश माहुले, अभय डांगरे, विनोद निंबार्ते, अरुण गोंडाणे, मोहन लुटे, मोहन वासनिक, गिरिश ठवकर, पंकज सुखदेवे, बिट्टू सुखदेवे, दिपक बेदुरकर, अनिल कडव, डिंगाबर गावड़े, नितेश ठवकर, दीपक जेठे, पना सार्वे यांसह नागरिक उपस्थित होते.