भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओबसी आणि मागासवर्गीय मुलामुलींच्या वासतिगृहा करिता लागणाºया जागे संदर्भात आज आ. नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेतला आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचा घेराव केला. यावर जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या द्वारे पुढील दोन दिवसात इसटीमेन्ट आणि आराखडा तयार करून मंजूरी करीता शासन दरबारी पाठविण्यात येईल असे आश्वासन मिळल्यावरच घेराव मागे घेण्यात आला. तसेच मिळालेल्या आश्वासनानुसार प्रस्ताव पाठविण्यात आले नाही तर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी आ. भोंडेकर यांनी आपल्या निवेदनात दिला.
उल्लेखनीय आहे की, ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या करिता शासना तर्फे जिल्हा स्थानावर मुला मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभारण्यास मंजूरी देण्यात आली होती. ज्याकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन जागा उपलब्ध करून प्रस्ताव पाठविने बंधनकारक होते. परंतुया मंजुरीला चार वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा जिल्हा प्रशासनाने या कडे दुर्लक्षच करीत जागा उपलब्ध करून दिली नाही. ज्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नुकसान सोसावे लागत आहे.
ही बाब आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी आज शिवसेना पदाधिकारी आणि जवळपास ५० कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेवर धावा बोलून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे याचा घेराव सुरू केला आणि आपल्या मागण्या त्यांच्या समक्ष ठेवल्या. सोबतच मागणी पूर्ण झाल्या शिवाय घेराव मागे घेणार नाही असा पावित्रा घेतला. ज्यावर रणदिवे यांनी या घेरवाची माहिती जिल्हाधिकारी कुंभेजकर यांना दिली ज्यावर त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाºयांना बोलावून वासतिगृहांचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. सोबतच पुढील दोन दिवसांत आराखडा आणि प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठविण्याची हमी आ. भोंडेकर यांना दिली.
या आश्वासना नंतर आ. भोंडेकर यांनी घेराव मागे घेतला आणि दोन दिवसात प्रस्ताव सादर नाही झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा देत त्या नंतर निर्माण होणाºया परिस्थितीला जिल्हा प्रशासन जवाबदार राहणार असल्याची चेतावणी दिली. या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर अध्यक्षमनोज साकुरे, अनुसूचित जाती जिल्हा प्रमुख संजय नगदेवे, युवा सेना शहर प्रमुख किशोर नेवारे, शहर संघटक नितीन धकाते, राजू देसाई, नितेश मोघरे, मंगेश मुरकुटे, नितीन पराते, बाबा तांडेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.