भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : करडी ते मुंढरी या वर्दळीच्या रस्त्याचे अतिशय संथगतीने सुरू आहे. अनेक महिन्यापासून काम अर्धवट असल्याने वाहनधारकांना अपघाताचा धोका लागून असतो. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मोहाडी तालुक्यात करडी व मुंढरी या दोन गावांना जोडणा-या मुख्य रस्त्याचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून कासव गतीने सुरू आहे. रस्त्यावर गिट्टी, बोल्डर टाकलेली असल्याने येथून ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. पादचा-यांना सुध्दा या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रास्तचे काम कासव गतीने असल्याने येथे अपघातचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही गावातील नागरिकांना आवागमनास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामात दिरंगाई न करता तातडीने काम पूर्ण करावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे.