शिक्षण विभागाच्या ब्लॉगवर सीईओ पाटील

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शासकीय-निमशासकीय कार्यालये डिजिटलायझेशन केले जात आहे. संबंधित कार्यालयांची आवश्यक माहिती व योजना सर्वसामान्य जनतेला माहीत व्हाव्यात म्हणून कार्यालयांच्या साईटवर संबंधित माहिती टाकली जाते. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला या बाबीचा विसर पडला आहे. मागील काही महिन्यांपासून गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची माहिती अद्ययावत करण्यात आलेली नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या ब्लॉगवर आजही मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल पाटील तर शिक्षणाधिकारी म्हणून महेंद्र गजभिये कार्यरत असल्याचे फोटोसह नमूद आहे. यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी कामाप्रती किती दक्ष आहेत, हेच प्रतीत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *