भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- परिसरातील सावरी येथे लग्न सोहळ्याचे कार्यक्रम मोठया जोमाने सुरू आहेत .सावरी गावात परमहंस संत शंकर महाराज आश्रम ला लागून असलेल्या जागेत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेतून भल्ले मोठे करोडो रुपयाचे सर्व धर्म समभाव या उद्देशाने सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात आले आहे.या भवनाची देखभाल संत शंकर महाराज आश्रम चे पदाधिकारी करीत असून.येथे लहान मोठे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळे करिता हजारो रुपये घेऊन कार्यक्रमाचे आयोजना करिता दिले जात आहे. धार्मिक, वाढदिवस व लग्न कार्यात उरलेले उष्टे अन्न आश्रम पदाधिकारी व कॅटर्स चालकांकडून चक्क रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत फेकले जात असल्याने नेहमीच मोठी दुगंर्धी पसरली जात असते.
परिणामी प्रवासी नागरिकांना व शेजारी राहणाºया नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने संत शंकर महाराज आश्रम सावरी येथील पदाधिकारी व कॅटर्स वाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या सांस्कृतिक समाज भवनात लग्नकार्य सुरू आहेत. लग्नकार्यालयातील शिल्लक व उष्टे अन्नाची आश्रम ट्रस्ट व कॅटर्सवाल्याक- डून विल्हेवाट लावताना चक्क रस्त्याशेजारी नालीत फेकले जात आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंंधी पसरली असून, प्रवासी नागरिक ,शेजारील वहिवाट करणाºया नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्याशेजारी नालीत सूडबुद्धीने अन्न टाकल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला असून, कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, या मार्गाने नागरिकांसह अधिकारी ,ग्रामपंचायत पदाधिकारीही जातात. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.