अखेर माहेश्वरी नेवारे यांचे जि. प. सदस्य पद रद्द

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली :- अनुसुचित जमाजी प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया यांचे दि. २५ जानेवारी २०२४ रोजीच्या आदेशान्वये माहेश्वरी हेमराज नेवारे (लग्नापूर्वीचे माहेश्वरी दुर्गाप्रसाद सुरजजोशी) यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जि. प. भंडारा किन्ही/ एकोडी, ता. साकोली अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असल्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे दि. ३ मे रोजीच्या पत्रान्वये जि. प. सदस्य रद्द करण्यात आले आहे. माहेश्वरी हेमराज नेवारे ह्या गोवारी जातीच्या असुन त्यांनी गोंड गोवारी जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून जि. प. क्षेत्र किन्ही/ एकोडी अनुसूचित जमाती महिला राखीव पदावर २०२१ ला निवडणूक लढविली व विजयी झाली होती. माहेश्वरी नेवारे यांचे गोंडगोवारी जातीचे प्रमाणपत्र खोटे आहे म्हणून सर्व आदिवासी संघटना व समाज बांधव यांचे वतीने किन्ही / एकोडी क्षेत्रातील आते गाव येथिल भगवान कळपते यांचे माध्यमातून माहेश्वरी हेमराज नेवारे यांचे विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय, भंडारा येथे आॅक्टोबर २०२२ ला निवडणूक याचिका दाखल केली होती.

दि.१३ मार्च ०२४ ला जिल्हा सत्र न्यायालय, भंडारा यांनी माहेश्वरी नेवारे यांच्या कागदपत्रांच्या पुराव्यावरून त्यांची जात गोवारी आहे त्यामुळे त्यांना गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे लाभ देता येत नाही म्हणून त्यांचे जिल्हा परिषद सदस्य पद रद्द करण्यात यावे असा कोर्टाने निकाल दिला. ही केस लढवितांना नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन भंडारा चे जिल्हाध्यक्ष धर्मराजभाऊ भलावी यांनी केसला आवश्यक माहिती पुरवून तसेच प्रत्येक सुनावणीच्या वेळेस भगवान कळपते यांचे सोबत प्रत्यक्ष हजर राहून महत्वाची भूमिका पार पाडली. ह्या केससाठी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव यांनी आर्थिक सहकार्य केले त्यामुळे हा विजय सर्व आदिवासी संघटना व समाज बांधव यांचा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा लढा यशस्वी करण्यासाठी भगवानजी कळपते व धर्मराजभाऊ भलावी यांनी खंबीरपणे महत्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल सर्व आदिवासी संघटना तसेच समाज बांधवाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *