भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली :- सध्या साकोली मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ सध्या तलाव पाळीवरील संरक्षित झाडाच्या पिंजºयापर्यंत गेला आहे. पुनश्च ३ पिंजºयावर या चोरट्यांनी हात साफ केल्याने आतापर्यंत एकूण १२ पिंजरे चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी हे पिंजरे चोरून नेल्याने तलाव पाळीवरील संपूर्ण झाडे उघडी पडली आहेत. एकोडी चौक ते तलाव वार्ड असा बायपास रस्ता तयार करण्यात आला. या तलाव पाळीच्या कडेला ७० ते ८० विविध जातींची झाडे मोठ्या महाप्रयासाने लावण्यात आली आणि ती जगवण्यात सुद्धा आली. या झाडांचे संगोपन व्यवस्थित व्हावे आणि झाडांची सुरक्षितता राहावी याकरिता नगरपरिषद कडून पिंजरे मागवून लावण्यात आले. परंतु काही दिवसापासून हे भुरटे चोर येथील पिंजरे काढून कबाडीमध्ये विकत आहेत. यापूर्वी नऊ पिंजरे चोरीला गेले .मात्र नगरपरिषद प्रशासनाने या संदभार्ची साधी तक्रारही पोलीस विभागाला दिली नाही.आता पुन्हा ३ पिंजरे चोरीला गेले असे एकूण १२पिंजरे आतापर्यंत चोरीला गेलीत. यापूर्वीच या चोरट्यांना न पकडल्यास पुन्हा पिंजरे चोरीला जातील अशी खंत या परिसरातील काही वृक्ष प्रेमींनी यापूर्वीच केली होती. मात्र याची दखल ना नगरपरिषदच्या मुख्याधिकारी यांनी घेतली ना पोलीस विभागाने. तक्रारच नाही तर पोलीस विभाग तरी काय करणार ? आतापर्यंत एकूण १२ पिंजरे चोरीला गेल्याने झाडांचे नुकसान झाले आहे. ज्याची भरपाई निघू शकत नाही. लवकरात लवकर या चोरट्यांच्या मुस्क्या बांधा अन्यथा वृक्ष प्रेमींनाच रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा वृक्ष प्रेमींनी दिला आहे.